Headlines

पौर्णिमा:नाचनवेल येथे वटवृक्ष‎लावून वटपौर्णिमा साजरी‎, वडाची पाच झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची शपथ‎




घाटनांद्र्यासह परिसरात वटपौर्णिमेचा सण सोमवारी ( २९ जून) पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या वेळी येथील हनुमान मंदिर परिसरातील वटवृक्षाजवळ ग्रामगुरुजी संजय शास्त्री यांच्या मंत्रोच्चारात सामूहिक पूजन करण्यात आले. सुवासिनींनी वटवृक्षाला सुताचा पवित्र धागा गुंडाळत सात प्रदक्षिणा घातल्या. पतीला आरोग्यसंपन्न, दीर्घायुष्य लाभावे तसेच जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी भावपूर्ण प्रार्थना महिलांनी केली. प्रतिनिधी | नाचनवेल कन्नड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नाचनवेल-कोपरवेल येथे वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वडाची पाच झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची शपथ घेण्यात आली. ग्रुप ग्रामपंचायत सरपंच कासाबाई थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ग्रामसेवक मनोहर पवार, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब शिंदे, भारत थोरात, संतोष काकफळे, पुंडलिक शिंदे, कौतिक शिंदे, दीपक चोतमल यांची उपस्थिती होती. आधुनिकता ही केवळ पेहरावातूनच नाही तर विचारातही असली पाहिजे. स्त्री ही केवळ आधुनिक नाही तर ती वैचारिकही आहे, याचा प्रत्यय सोमवारी वटपौर्णिमेच्या निमित्ताने आला. सावित्रींनी वडाच्या रोपांचे रोपण करून पौर्णिमा साजरी केली. धावपळीच्या युगात सण साजरे करण्यासाठी लागणाऱ्या सर्वच गोष्टी उपलब्ध होतात असे नाही. त्यामुळे जो तो आपल्या सोयीनुसार, उपलब्धतेनुसार सण साजरे करू लागला आहे.दरम्यान, वटपौर्णिमेला फांद्यांची छाटणी करण्याऐवजी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न करताना नाचनवेल येथील महिलांनी वडाची पाच रोपे लावून आगळ्यावेगळ्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली. वडाचे झाड हे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. या वेळी अंगणवाडी सेविका तारा सुरडकर, मनीषा थोरात, सुमित्रा वाहटुले, सीमा सुखदाने, शोभा सोनवणे, सुरेखा जयस्वाल, रिता राजपूत, सोनल अवसारे, निकिता राऊत, लुमावती वैद्य, सोजाबाई महाले आदी महिलांची होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *