Headlines

लोणी खुर्द येथे पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद:अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यांचा सहभाग‎




वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे रविवारी(२८ जून) राज्य शासनाच्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले. या मोहिमेत वैद्यकीय अधिकारी डॉ. चुंकीकर, अंगणवाडी सुपरवायझर जमदाडे, अंगणवाडी सेविका मीरा खोसरे, स्मिता जाधव, आशा सेविका सरला रूपवते, ज्योती जाधव, निर्मला वनसे, सविता नरवडे यांच्यासह लोणी खुर्द परिसरातील अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, आरोग्य कर्मचारी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. लसीकरण मोहिमेदरम्यान गावातील लसीकरण केंद्रावर पालकांनी आपल्या बालकांना आणून पोलिओ प्रतिबंधक बायव्हॅलेंट ओरल पोलिओ व्हॅक्सिनचे दोन थेंब पाजले. प्रत्येक बालकापर्यंत लसीकरणाची सेवा पोहोचावी यासाठी अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली. पालकांना लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले. केंद्रावर येऊ न शकलेल्या बालकांसाठी आरोग्य विभागामार्फत गृहभेटींचे नियोजन करण्यात आले आहे. कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *