![]()
जून महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेत असलेल्या फुलंब्री आणि सोयगाव तालुक् यांतील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. दोन्ही तालुक्यांत झालेल्या समाधा नकारक पावसामुळे खोळंबलेल्या खरिपाच्या पेरण्या आणि लागवडीच्या कामांना जोमाने सुरुवात झाली असून बळीराजा सुखावला आहे. सोयगाव तालुक्यात लागवडीच्या हंगामात मजुरांची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असून, शेतकऱ्यांना वाढीव मजुरी देऊन कामे करून घ्यावी लागणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी जमिनीतील उष्णता (वाफसा) पूर्णपणे कमी होईपर्यंत लागवड न करण्याची भूमिका घेतली आहे. सोयगाव तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी कापूस, मका आणि हळद लागवडीच्या कामाला प्रारंभ केला आहे. तर फुलंब्री तालुक्यात कापूस, मका आणि सोयाब नच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाला असला, तरी अद्याप मोठा मुसळधार पाऊस झालेला नाही. यामुळे परिसरातील विहिरी आणि जलस्त्र तांच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. विहिरी कोरड्याच असल्याने शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान विभागाने आगामी दिवसांत चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने दोन्ही तालुक्यांतील शेतकरी सुखावले असून पुढील काळात दमदार पाऊस होईल, अशी आशा व्यक्त करत आहेत. फुलंब्री तालुक्यात धूळपेरणीला नवजीवन फुलंब्री तालुक्यात सुरुवातीला पावसाने प्रदीर्घ ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला होता. पावसाचा अंदाज घेऊन काही शेतकऱ्यांनी आधीच धूळ पेरणी केली होती, मात्र पाऊस लांबल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली होती. अखेर शुक्रवारी रात्री झालेल्या समाधानकारक पावसामुळे या पिकांना नवजीवन मिळाले आहे. सध्या तालुक्यात कापूस, मका आणि सोयाबीनच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाला असला, तरी विहिरी आणि जलस्त्रोतांच्या पाणीपातळीत वाढ होईल असा मुसळधार पाऊस न झाल्याने शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
Source link
फुलंब्री, सोयगाव तालुक्यात पेरण्यांना वेग:कापूस, सोयाबीन लागवडीकडे कल, काही ठिकाणी मुसळधार, तर कुठे समाधानकारक पाऊस