Headlines

हवामान:मान्सून आजपासून वेग घेईल; 4 दिवसांत सर्व राज्यांत पोहोचणार, पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार




पूर्व किनाऱ्यावर 18 दिवसांपासून अडकलेला मान्सून मंगळवारपासून वेग घेईल. पुणे भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या अहवालानुसार, पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. गेल्या 24 तासांत कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस व अतिवृष्टी झाली, तर विदर्भ आणि मराठवाड्यातही पाऊस नोंदवला गेला आहे. तर 29 जून ते 5 जुलै या काळात कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 2 आणि 3 जुलै रोजी महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी जोरदार विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. एकाच वेळी तयार झालेल्या अनेक हवामान सिस्टीम्समुळे संथ पडलेल्या मान्सूनमध्ये जीव आला आहे. मंगळवारी उत्तर प्रदेशपासून उत्तराखंडपर्यंत धडक देण्याची शक्यता आहे. जालन्याच्या मंठ्यात ढगफुटीसदृश पाऊस जालना‎ जिल्ह्यातील मंठा परिसरात‎ ढगफुटीसदृश, तर‎ अंबड शहरासह परिसरातील अनेक भागांमध्ये ‎विजांच्या कडकडाटासह जोरदार पुनरागमन ‎केले. हा पाऊस खरीप पिकांच्या उगवणीसाठी‎ आणि वाढीसाठी अत्यंत लाभदायक ठरणार ‎असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे‎ वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान,‎ ढोकसाळ तांड्यात पावसाचे पाणी शिरल्याने‎ काही वेळ नागरिकांत भीतीचे वातावरण ‎पसरले होते. रात्री जालना शहरातही पाऊस‎ झाला.‎ एकीकडे पावसाने शेतकऱ्यांना दिलासा‎ दिला असतानाच दुसरीकडे मंठा तालुक्यातील‎ मौजे ढोकसाळ परिसरात झालेल्या जोरदार‎ पावसामुळे गावालगत असलेल्या नाल्याला‎ अचानक मोठ्या प्रमाणात पूर आला. नाल्याचे‎ पाणी वेगाने वाढल्यामुळे ढोकसाळ तांड्याचा ‎‎मुख्य गावांशी असणारा संपर्क तात्पुरता तुटला ‎‎आहे. तसेच पुराचे पाणी थेट तांड्यातील‎ घरांमध्ये आणि रस्त्यांवर शिरल्याने‎ नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण‎ निर्माण झाले होते.‎ बीडला दोन दिवस यलो अलर्ट‎ हवामान खात्याने संकेतस्थळावरुन‎ बीड जिल्ह्याला पुढील 2 दिवस‎ पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.‎ या दरम्यान 30 ते 40 किमी प्रतितास ‎या वेगाने वारे वाहणार असून ‎विजांचा कडकडाटसह पाऊस‎ होण्याची शक्यता आहे.‎ जळगावात पावसाची दमदार हजेरी जळगाव‎ जिल्ह्यात सोमवारी झालेला पाऊस पुढे ‎सुरू राहणार आहे. 4 जुलैपर्यंत ‎शहर व जिल्ह्यात कमी-अधिक ‎प्रमाणात पाऊस पडणार आहे,‎ अशी शक्यता हवामान ‎अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.‎
अहिल्यानगरला पुढचे 4 दिवस येलो अलर्ट‎ हवामान विभागाने 30 जून ते 3 जुलै या‎ कालावधीत अहिल्यानगर‎ जिल्ह्यात विजांच्या‎ कडकडाटासह वादळी वारे आणि हलक्या ते‎ मध्यम स्वरूपाच्या पावसाचा ”येलो अलर्ट”‎जारी केला आहे. जून महिन्यात सरासरीपेक्षा ‎कमी पाऊस झाल्याने खरिपाचे संकट वाढले ‎असून, अनेक भागांत अद्याप पेरण्या झालेल्या‎ नाहीत. आता जुलैत तरी दमदार पाऊस होईल‎ आणि खरिपाला संजीवनी मिळेल, अशी‎आशा आहे.‎ लातूरला पुढील चार दिवस यलो‎ अलर्ट, खबरदारीचे आवाहन‎ हवामान विभाग आणि जिल्हा आपत्ती‎ व्यवस्थापन प्राधिकरणाने लातूर‎ जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस “यलो‎अलर्ट” जारी केला आहे. या काळात ‎जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची‎ शक्यता असल्याने, शेतकरी आणि‎ नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊन‎ आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन‎ प्रशासनाने केले आहे. सातत्याने रिमझिम ‎पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.‎
रेणापूर नाका परिसरात झाड कोसळले, तिघे जखमी‎ शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात (नविन रेणापूर‎नाका) विष्णूदास मंगल कार्यालया शेजारी सोमवारी दुपारी भले मोठे झाड‎मुळासकट कोसळल्याची घटना घडली. यात कर्तव्यावर असलेला वाहतूक ‎शाखेचा एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. त्यांच्यासह आणखी दोन ‎नागरिकही या घटनेत जखमी झाले असून सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात‎ दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने झाडाचा मोठा भाग शेजारील टपरीवर ‎पडल्याने नागरिकांना गंभीर दुखापत झाली नाही. घटनेनंतर परिसरात काही‎ काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तातडीने‎ मदतकार्य करत जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात‎ हलविले. अकोला जिल्ह्यात 3 दिवस ‎पावसाची शक्यता‎ अकोला जिल्ह्यात 29 जून ते 2 ‎जुलैपर्यंत काही ठिकाणी‎ विजाच्या कडकडासह पाऊस‎ पडण्याची शक्यता नागपूरच्या ‎प्रादेशिक हवामान केंद्राने‎ वर्तवली आहे. यादरम्यान ताशी‎ 40 ते 50 किमी प्रति तास याप्रमाणे ‎हवेचा वेग राहण्याची शक्यता ‎आहे. काही ठिकाणी ‎सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या‎ गडगडाटासह विजा आणि ‎पाऊस पडण्याची शक्यता‎ वर्तवण्यात आली आहे.‎ अशावेळी आवश्यक ते कारण‎ असल्याशिवाय घराबाहेर पडू‎ नका, जनावरांना झाडांना किंवा ‎विजेच्या तारेच्या खाली बांधू‎ नका. विज, वारा व पावसापासून ‎बचावाकरिता सुरक्षीत ठिकाणी ‎आश्रय घ्यावा, असा सल्ला‎ देण्यात आला आहे.‎‎ येत्या तीन-चार दिवसांत देशातील उर्वरित प्रत्येक राज्य हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थानमध्येही मान्सून आपली उपस्थिती नोंदवू शकतो. हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या 24 तासांत मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि झारखंडमध्येही मान्सून पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, पश्चिम हरियाणा, पश्चिम पंजाब, पश्चिम राजस्थान आणि उत्तर गुजरातपर्यंत पोहोचण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. मान्सूनने संपूर्ण देश कव्हर करण्याची सामान्य तारीख 8 जुलै आहे. भास्कर एक्स्पर्ट डॉ. मृणालिनी देवी, भूगर्भशास्त्रज्ञ, ईटानगर हिमालयाची नाजूक रचना वाढवते भूस्खलनाचा धोका हिमालय जगातील सर्वात तरुण पर्वतरांगांपैकी एक आहे. येथील उतार अत्यंत नाजूक आणि अस्थिर आहेत. सतत होणारा मुसळधार पाऊस, भूकंप आणि मातीची धूप यामुळे अनेकदा मोठी भूस्खलने होतात. अशा परिस्थितीत तात्पुरते तलाव तयार होतात. अशा अडथळ्याला ‘लँडस्लाइड डॅम’ म्हटले जाते. हा काँक्रीट किंवा दगडांचा कायमस्वरूपी बांध नसतो, त्यामुळे पाण्याचा दाब वाढल्यावर तो अचानक तुटू शकतो. यामुळे सखल भागात पुराचा धोका असतो. अशा घटना यापूर्वीही हिमालयीन भागात समोर आल्या आहेत. 2000 मध्ये तिबेटमधील पारछू नदीवर बनलेला असाच तलाव फुटल्याने हिमाचलमधील सतलज खोऱ्यात मोठी जीवित व वित्तहानी झाली होती.
आसाम-अरुणाचलात पूर-भूस्खलनामुळे हाहाकार, 22 हजार लोक प्रभावित, 4 मृत्यू; मदत व बचाव कार्यात गुंतले वायुदल अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील 12 हून अधिक जिल्हे प्रभावित आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्याशी फोनवर संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. पूर मदत कार्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, असा विश्वास त्यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *