Headlines

पिंपळदरी येथे आरोग्य उपकेंद्रामध्ये पल्स पोलिओ मोहिमेला प्रतिसाद




येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात रविवारी (२८ जून) सकाळी आठ वाजता पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच पूजा सुनील माहोरे यांच्या हस्ते बालकांना डोस देण्यात आला. यात शून्य जन्मापासून ते पाच वर्षांपर्यंतच्या सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले. या मोहिमेला गावातील पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी आपल्या पाल्यांना लसीकरणासाठी आणले. आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविकांनी घरभेटी देऊन जनजागृती केली. त्यांनी लसीकरणाचे नियोजन केले. त्यामुळे मोहीम यशस्वी झाली. “पाच वर्षांखालील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,” असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले. या वेळी डॉ. नासिर कुरेशी, आरोग्य सेविका अश्विनी लहाने, आशा सेविका साजिया खान, वंदना बेलेकर, अंगणवाडी सेविका सुनीता तुरे, आरोग्य सेवक ऋषिकेश वांजळे, सुनील माहोर, गणेश कोलते, भागाजी जंजाळ, सुदाम काळे, तसेच गावातील महिला व बालके उपस्थित होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *