Headlines

पल्स पोलिओ मोहीम:फुलंब्री तालुक्यामध्ये 98% बालकांना पोलिओचा डोस, शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांसाठी लसीकरण‎




राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत फुलंब्री तालुक्यात रविवारी शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांसाठी लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबवण्यात आली. तालुक्यात एकूण १४ हजार १९० बालकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी पहिल्याच दिवशी १३ हजार ८९३ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्यात आली. यामुळे पहिल्याच दिवशी तालुक्यात ९८% लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य झाले असून उर्वरित बालकांना आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी भेट देऊन लस पाजण्यात येणार आहे. फुलंब्री तालुक्यातील जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जि. प. सदस्या गीतांजली वरुण पाथ्रीकर यांनी पुढाकार घेते पोलिओ डोससंदर्भात जनजागृती करत पोलिओ डोस केंद्राचे उद्घाटन करत पोलिओ डोस दिला‌ तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच मुख्य चौकातील बूथवर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या मोहिमेचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. नागरिकांनीही आपल्या बालकांना लस देण्यासाठी बूथवर गर्दी केली होती. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्न भाले, तालुका पर्यवेक्षक प्रकाश ब्रह्मकर, विस्तार अधिकारी दादासाहेब बांगर यांच्यासह डॉ. जगदीश सावंत, डॉ. आनंद लोंढे, डॉ. पूर्वा गोंड, डॉ. स्वाती काकडे, डॉ. प्रथमेश उमरेकर यांनी पुढाकार घेतला. या वेळी मोहिमेला प्रतिसाद मिळाला. फुलंब्री तालुक्यातून मोहिमेला मोठा हातभार सर्व घटकांच्या संयुक्त सहकार्यामुळे ही मोहीम प्रभावीपणे राबवता आली. यामुळे बालकांचे पोलिओपासून संरक्षण अधिक मजबूत झाले असून ‘पोलिओमुक्त भारत’ या राष्ट्रीय उद्दिष्टाला फुलंब्री तालुक्यातून मोठा हातभार लागला आहे अशी प्रतिक्रिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्न भाले यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *