Headlines

मल्लिकार्जुन अन् पाचपीर देवाच्या यात्रेला सुरुवात:बोरेगांव यात्रेमुळे हिंदू- मुस्लिम समाजात एकोपा‎

अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन व पाचपीर देवाच्या यात्रेस गुरुवारपासून उत्साहात प्रारंभ झाला आहे. गुरुवारी श्री मल्लिकार्जुन देवास रुद्राभिषेक घालण्यात आले. त्यानंतर मूर्तीला १०८ बिल्व अर्पण करण्यात आले आहे. पाचपीर देवास गलिपधारण करण्यात आले आहे. त्यानंतर मज्जलसी हा मुख्य धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. शुक्रवार दि. १० एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता पाचपीर देवास…

Read More

जिल्हा सह. बँक अध्यक्षपदी डॉ. कोरपे, उपाध्यक्षपदी ठाकरे

अकोला- वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जयराज संतोषकुमार कोरपे तर उपाध्यक्षपदासाठी रामेश्वर सुभाषराव ठाकरे यांचे एक- एकच अर्ज आले. त्यामुळे अध्यासी अधिकारी गितेशचंद्र साबळे यांनी अध्यक्षपदी डॉ. जयराज कोरपे तर उपाध्यक्षपदी रामेश्वर ठाकरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. संतोषकुमार कोरपे यांच्या नेतृत्वात सहकार पॅनलने जिल्हा बँकेची सत्ता राखत पुन्हा वर्चस्व सिद्ध केले…

Read More

114 नवीन राफेल स्वदेशी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असतील:18 जेट फ्रान्समधून येतील, 96 भारतात बनवले जातील; सोर्स कोड मिळणार नाही

भारत फ्रान्सकडून 114 नवीन राफेल फायटर जेट्स खरेदी करत आहे. यांना स्वदेशी क्षेपणास्त्रे आणि शस्त्र प्रणालीने सुसज्ज केले जाईल. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, करारात इंटरफेस कंट्रोल डॉक्युमेंट (ICD) समाविष्ट करण्याची तयारी सुरू आहे, जेणेकरून स्वदेशी प्रणाली जेट्समध्ये जोडता येतील. ICD हे एक दस्तऐवज आहे, जे फायटर जेट आणि त्याच्या विविध प्रणालींमधील समन्वय निश्चित करते. यामुळे भारत…

Read More

संतोष देशमुखांच्या हत्येची तक्रार मागे घ्या!:आरोपींचा धनंजय देशमुखांना प्रस्ताव, जेलमधून बाहेर आलेल्या दादासाहेब खिंडकरांचा दावा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर हे तब्बल 13 महिन्यांच्या कारावासानंतर अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत. एका तरुणाला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता, ज्यासाठी त्यांना वर्षभरापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावे लागले. कारागृहातून सुटका झाल्यानंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी, पुष्पगुच्छ आणि ओवाळणी करत…

Read More

Disha Vakanis Father Bhim Vakani Dies; Worked With SRK & Aamir

3 दिवसांपूर्वी कॉपी लिंक तारक मेहता का उल्टा चष्मा मधील दयाबेनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा वकानी यांचे वडील अभिनेते भीम वकानी यांचे आज निधन झाले. भीम वकानी, गेल्या काही काळापासून वयोमानानुसार येणाऱ्या समस्यांशी झुंज देत होते. ते त्यांची मुलगी दिशाच्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतही दिसले होते, याशिवाय त्यांनी शाहरुख खान आणि आमिर…

Read More

शैक्षणिक सहलीतून ‘प्रत्यक्ष शिक्षणा’चा अनुभव:किड्झी प्री स्कूलतर्फे आयोजन; भाजी, फळ बाजार, गोशाळा, पोलिस ठाण्यात भेट‎

विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता त्यांना प्रत्यक्ष जीवनाशी जोडणारे शिक्षण देण्याच्या उद्देशाने येथील किडझी प्री स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेली वार्षिक शैक्षणिक सहल उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या उपक्रमामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना ‘प्रत्यक्ष शिक्षणा’चा अनोखा आणि समृद्ध अनुभव घेता आला. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना शहरातील भाजी बाजार, फळ बाजार, गोशाळा तसेच पोलिस ठाण्याला भेट देण्यात…

Read More

पूर्णा नदीवर अडीच कोटीतून उभारणार घाट:आ. सावरकरांच्या हस्ते भूमिपूजन

म्हैसांग येथे पूर्णा नदीवर आमदार रणधीर सावरकर यांच्या अडीच कोटी रुपयांच्या विशेष विकास निधीतून घाट उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आ. रणधीर सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले. विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी अकोला व अमरावती जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने पूर्णा नदीवर येतात. पूर्णा नदीवर दशक्रिया, अस्थी विसर्जन आदी विधी सुद्धा पार पडतात. भाविकांच्या मागणीची दखल घेत…

Read More

रजनीकांतच्या 'जेलर 2' मध्ये शाहरुख दिसणार नाही:कॅमिओ ऑफर नाकारली; मुलगी सुहानाच्या 'किंग'वर लक्ष केंद्रित, चित्रपटापूर्वी मोठ्या पडद्यावर दिसू इच्छित नाहीत

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने रजनीकांतच्या ‘जेलर 2’ या चित्रपटात कॅमिओ करण्यास नकार दिला आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, शाहरुख सध्या त्याच्या आगामी ‘किंग’ या चित्रपटावर पूर्ण लक्ष केंद्रित करू इच्छितो. त्याला ‘किंग’च्या प्रदर्शनापूर्वी कोणत्याही चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसायचे नाही. शाहरुखने रजनीकांत आणि चित्रपटाच्या निर्मात्यांशी बोलून ही ऑफर नम्रपणे नाकारली आहे. मुलगी सुहानाच्या पदार्पणामुळे घेतला निर्णय शाहरुख खानसाठी…

Read More

बार्शीटाकळी येथे नागरी वस्तीमधून 800 लिटर अवैध डिझेल साठा जप्त:राज्य अन्न आयोग सदस्या व पुरवठा विभागाचा छापा‎

शहरातील इंदिरा आवास भागात गुरुवारी प्रशासनाने एक मोठी कारवाई करत नागरी वस्तीत साठवलेले सुमारे ८०० लिटर अवैध डिझेल जप्त केले आहे. राज्य अन्न आयोगाच्या सदस्य आणि तालुका पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे हा छापा टाकला. दाट लोकवस्ती असलेल्या भागात अशा अत्यंत ज्वलनशील पदार्थाचा साठा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गु्प्त माहितीवरून प्रशासनाने ही कारवाई केली. मिळालेल्या…

Read More

अशोक खरात प्रकरणात मोठा गौप्यस्फोट:160 जीबी डिजिटल पुरावे, A, B, C कोडवर्ड मधून काळे कारनामे उघड; प्रकरणात मोठी घडामोड

नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता धक्कादायक तपशील समोर येत आहेत. तपास यंत्रणांनी 160 जीबी इतका डिजिटल डेटा जप्त केला असून, या पुराव्यांमुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. फॉरेन्सिक तपास पूर्ण करून हा अहवाल विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सादर करण्यात आला आहे. या नव्या पुराव्यांमुळे खरात यांच्या भोवतीचा कायदेशीर फास अधिक घट्ट होत…

Read More