एसटीच्या तुघलकी निर्णयाने सुरू झाली प्रवाशांची परवड:एनसीएमसी कार्डच्या अर्धवट अंमलबजावणीविरुद्ध संताप
पूर्वकल्पना न देता, पूर्वतयारी न करता एसटी महामंडळाने १ सप्टेंबरपासून लागू केलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) च्या निर्णयामुळे राज्यात गोंधळ उडाला. या निर्णयाने ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, लहान मुलांना प्रवास दरात दिली जाणारी सुट जवळपास संपुष्टात आली. त्यामुळे हा तुघलकी निर्णय परत घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी केली. यासंदर्भात त्यांनी…