Headlines

मुलांच्या धर्मांतरासाठी शिक्षकावर दबाव:वीरगावला 5 जणांवर गुन्हा, नोकरीसाठी आधी पती-पत्नीचे 5 लाखांत धर्मांतर केले




स्थायी शिक्षकाची नोकरी देण्याच्या आमिषाने पती-पत्नीचे धर्मांतर करून घेत त्यांच्याकडून पाच लाख रुपयेही उकळले. नंतर या दांपत्यावर त्यांच्या दोन्ही मुलांच्या धर्मांतरासाठी दबाव आणला गेला. पण दांपत्याने यास नकार देत पैसे परत करून नोकरी नाकारली. बोरसर येथील शांती सदन प्राथमिक शाळेशी संबंधित या प्रकरणात वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलिसांनी शनिवारी पाच जणांसह संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फादर आशिष म्हस्के, सुदाम उबाळे, फादर जेरॉल्ड रिबेलो, संजय रूपेकर व विनोद शेलके यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. तक्रारदार बाळासाहेब अप्पासाहेब साठे व पत्नी पूजा हे 2024 मध्ये शांती सदन प्राथमिक शाळेत शिक्षक होते. मात्र त्यांना लेखी नियुक्ती आदेश दिले नव्हते. सुरुवातीला दोघांना येण्या-जाण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये दिले जात होते. पुढे स्थायी नोकरीसाठी धर्मांतर करण्यासह 5 लाख रुपये रक्कम देण्यास सांगण्यात आले. दांपत्याने यासाठी पैसेही दिले. माळीघोगरगाव येथील चर्चमध्ये फादर आशिष म्हस्केच्या माध्यमातून त्यांनी आपले व पत्नीचे धर्मांतर केले. पण नंतर मुलांच्या धर्मांतरणासाठी संस्थाचालकाने दबाव वाढवल्याने पूजा पत्नीने नोकरी सोडली, असा आरोप बाळासाहेब यांनी केला. संस्थेच्या कार्यालयापर्यंत पोहोचला व्यवहार पाच लाखांपैकी 4.80 लाख रुपये संजय रूपेकर यांच्या घरी दिल्याचा दावा आहे. उर्वरित 20 हजार रुपये सेव्हन हिल्स येथील एसएफएस सेंट फ्रान्सिस सोसायटीच्या कार्यालयात दिल्याचा दावा आहे. संजय रूपेकर यांचा पत्ता सेंट थॉमस चर्च, सेव्हन हिल्स असा एफआयआरमध्ये नमूद आहे. विनोद शेलके यांचा पत्ता माजरी, ता. गंगापूर असा एफआयआरमध्ये नमूद आहे. उधारीवर 5 लाख घेऊन भरले कायमस्वरूपी नोकरीसाठी संस्थेने धर्मांतराव्यतिरिक्त पाच लाख रुपयांची मागणी केली होती. आपल्या मित्रांकडून उधारीने पैसे गोळा करून जुलै महिन्यात 4 लाख 80 हजार रुपये संस्थेच्या एका पदाधिकाऱ्याला घरी नेऊन दिले, तर उर्वरित 20 हजार रुपये संस्थेच्या कार्यालयात जमा केले. मात्र, मुलांचे धर्मांतर करण्यास नकार दिल्यावर संस्थेने त्यांना नोकरी न देता त्यांच्या जागी दुसऱ्याच व्यक्तीची नेमणूक केली. या जातीय आणि आर्थिक शोषणातून कुटुंबाला मोठा मानसिक मनस्ताप सहन करावा लागला, असा आरोप बाळासाहेब साठे यांनी तक्रारीत केला आहे. फसव्या मार्गाने धर्मांतर घटनेनुसार बेकायदेशीर भारतीय संविधानाच्या कलम 25(1) नुसार देशातील प्रत्येक नागरिकाला सद्सद्विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि आपला धर्म अबाधितपणे मानण्याचा, आचरण्याचा आणि त्याचा प्रसार करण्याचा अधिकार आहे. धर्माचा ‘प्रसार’ करण्याच्या अधिकारामध्ये कोणाचेही धर्मांतर करण्याचा अधिकार समाविष्ट नाही. फसवणूक, बळजबरी आमिष किंवा फसव्या मार्गांनी धर्मांतर करणे हा बेकायदेशीर गुन्हा मानला जातो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *