![]()
सिल्लोड तालुक्यातील सुमारे सहा हजार लोकसंख्या असलेल्या पिंपळगाव पेठ येथील आरोग्य वर्धिनी उपकेंद्र गेल्या सहा महिन्यांपासून केवळ कागदावरच सुरू असून, महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी होणाऱ्या लसीकरणाच्या दिवशीच याचे कुलूप उघडले जाते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सध्या वातावरणातील बदलांमुळे गावात सर्दी, खोकला, थंडी-ताप आणि व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र, गावात प्राथमिक आरोग्य सुविधाच उपलब्ध नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना उपचारासाठी भटकावे लागत आहे. किरकोळ आजारासाठीही ग्रामस्थांना बाहेरील सरकारी रुग्णालये किंवा महागड्या खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे. जनसमुदाय अधिकारी व आरोग्य सेविका उपकेंद्र परिसरात फिरून फोटो काढून वरिष्ठांना पाठवत खोटी उपस्थिती दर्शवित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आणि त्यांची रोजची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी सुरू करावी, अशी जोरदार मागणी पिंपळगाव पेठवासीयांनी केली आहे. आता आरोग्य प्रशासन या बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काय परिस्थिती आहे ते बघतो Ãमला या प्रकाराविषयी माहिती नाही. मात्र मी या संदर्भात मेडिकल ऑफिसर यांना बोलून प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे ते बघतो. आणि कायमस्वरूपी एनएमकशी देता येईल याविषयीही बघतो. -नासेर पठाण, तालुका आरोग्य अधिकारी, सिल्लोड
Source link
लसीकरणाच्या दिवशीच उपकेंद्र उघडे:ग्रामस्थांना उपचारासाठी धरावी लागते बाहेरची वाट