![]()
दुष्काळी परिस्थितीमध्ये हाताला काम द्या, कामाचा दाम द्या, धान्य द्या, या मागणीसाठी काढण्यात आलेल्या शेतकरी, शेतमजुरांच्या मोर्चावर पोलिसांनी ६ सप्टेंबर १९७१ रोजी केलेल्या बेछूट गोळीबारात ८ जण शहीद झाले. तर भाई सर्जेराव सगर व माजी आमदार नरसिंगराव देशमुख यांच्यासह ५४ लोक जखमी झाले होते. ५६ वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेच्या स्मृती वैरागकरांनी आजही जपल्या आहेत. या हुतात्म्याच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी वैराग तलाठी कार्यालयाच्या शेजारी एक स्मृतिस्तंभ उभा केला आहे. दरवर्षी ६ सप्टेंबर रोजी तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर एकत्र येतात व वैराग येथील खंडोबा वेसपासून मुख्य गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून हा मूक मोर्चा काढून स्तंभाला पुष्पचक्र वाहतात. ही परंपरा ५६ वर्षांनंतर चालू आहे. या घटनेनंतर रोजगार हमी कायदा या घटनेनंतर राज्य शासनाने रोजगार हमी कायदा लागू केला. या गोळीबार प्रकरणानंतर तत्कालीन महाराष्ट्र सरकारने रोजगार हमी कायदा केला. आणि त्यानंतर केंद्र सरकारनेही तो रोजगार हमी कायदा संपूर्ण देशात लागू करावा लागला. लोक सैरभैर धावत सुटले होते. चेंगराचेंगरी झाली. अनेकाना पोलिसांनी पकडून बेदम मारहाण केली. त्यावेळचे एसपी डेमला यांनी दिला होता.
Source link
शेतकरी मोर्चामधील 8 हुतात्म्यांची स्मृती जपणारा स्तंभ