Headlines

शिक्षण आयुक्त कार्यालयावर आंदोलन:संच मान्यतेच्या अन्यायकारक निकषाला विरोध, महासंघ व विज्युक्टाचा सहभाग‎




ऑनलाइन संचमान्यतेच्या अन्यायकारक निकषांविरुद्ध राज्यातील अनेक शिक्षकांनी महासंघ व विज्युक्टाच्या नेतृत्वात महामोर्चा काढून शिक्षण आयुक्त कार्यालयाला घेराव घातला. या आंदोलनात अमरावतीच्या शिक्षकांनीही सक्रिय सहभाग घेतला. संचमान्यतेचे घातक निकष लादून हजारो शिक्षकांचा कार्यभार संपविण्याचा हा डाव असल्याचा आरोप डॉ. अविनाश बोर्डे यांनी मोर्चाला संबोधित करताना केला. शुक्रवारी पुणे येथे महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, कार्याध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे, समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर, कोषाध्यक्ष डॉ. अशोक गव्हाणकर, प्रा. लक्ष्मण रोडे, प्रा. संतोष फाजगे, प्रा. रवींद्र पाटील आदींच्या नेतृत्वात महामोर्चा काढण्यात आला. शिक्षण सहआयुक्त डॉ. श्रीराम पानझाडे यांनी मोर्चामध्ये येऊन आंदोलनाचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर शिक्षण संचालक महेश पालकर यांच्या समवेत चर्चा झाली. दरम्यान, शासन पातळीवर हा विषय घेऊन धोरणात्मक निर्णयासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी मान्य केले. या आंदोलनामध्ये प्रा. रमेश खाडे, प्रा. डी. एस. राठोड, प्रा. भाऊ गोरे, प्रा. अनिल काळे, डॉ. अभिजित पोटले, प्रा. संतोष कुटे, प्रा. संतोष अहिर, प्रा. रमेश जोल्हे, प्रा. संजय देवतळे, डॉ. चेतन हिंगणीकर, डॉ. प्रवीण चटप उपस्थित होते. हे आहेत महत्त्वाचे विषय तुकडी टिकवण्याचे प्रचलित निकष कायम ठेवताना प्रात्यक्षिकासाठी विद्यार्थी संख्या २० राखणे, ४५ मिनिटांची तासिका, मुलींची संख्या लक्षात घेऊन तुकडी टिकवणे, तुकडीसाठी किमान विद्यार्थी संख्या पूर्वीप्रमाणे कायम ठेवणे आदी मुद्दे यावेळी अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आले. अनुदानाच्या टप्प्यासाठी शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाबाबत अडचण येणार नाही, हे कटाक्षाने लक्षात घेण्यासंदर्भातही अनुकूल चर्चा झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *