Headlines

पानगावात आदर्श शिक्षकांचा पुरस्काराने गौरव:स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात‎




बार्शी तालुक्यातील पानगाव येथे शहीद जवान स्मारक बहुउद्देशीय संस्था व माजी सैनिक संघटना उपशाखा पानगाव यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवले. तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण समारंभ जिल्हा परिषद शाळेत उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी सरपंच अंकुश मोरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी तालुका माजी सैनिक संघटनेचे माजी अध्यक्ष सुभेदार हरिश्चंद्र नवले, जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार काळे, उपसरपंच रोहिणी जमदाडे, माजी सरपंच मनोज पाटील, दत्तात्रय काळे, तंटामुक्ती अध्यक्ष अप्पासाहेब कानगुडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व पानगाव येथील भूमिपुत्र देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच शहीद जवान स्मारक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सचिन कापसे यांच्या वतीने विविध स्पर्धा परीक्षांत यश संपादन केलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना बक्षिसे देण्यात आली. शिक्षक दिनाचे औचित्य साधून संत तुकाराम विद्यालय पानगाव, जिल्हा परिषद शाळा क्र. १, २ व मुलींची शाळा या शाळेतील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक तसेच शिक्षक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी शहिद जवान स्मारक बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुलभा काळे यांनी केले. अक्षरओळखीपासून वर्गाबरोबच जीवनाच्या वाटेवरून जाण्यासाठी योग्य दिशा दाखवणाऱ्या तालुक्यातील शिक्षकांप्रती कृतज्ञता भाव म्हणून आदर्श कार्याबद्दल पुरस्कार दिला. उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार या वेळी आदर्श शिक्षिका म्हणून कल्पना उकिरडे व सुरेखा हांगे (जिल्हा परिषद शाळा क्र. १), दैवशाला सातपुते व महादेवी स्वामी (जिल्हा परिषद शाळा क्र. २), मधुरा पाटील व सीमा देशमुख (जिल्हा परिषद मुलींची शाळा), तसेच संगीता मोरे व बालाजी जगताप (संत तुकाराम विद्यालय, पानगाव) यांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *