![]()
राजेश्वर युनियन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षकदिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित ‘स्वयंशासित शाळा’ उपक्रमात ५० विद्यार्थ्यांनी शिक्षक-शिक्षिकांसह विविध पदांची जबाबदारी स्वीकारत एक दिवस शाळेची धुरा सांभाळली. संपदा खरतडे यांनी प्राचार्य, संचुका चोरे यांनी उपप्राचार्य, तर अंशुमन भडके, चैतन्य कैकाडे व शौर्य धर्माळे यांनी शारीरिक शिक्षकाची भूमिका बजावली. विद्यार्थ्यांनी लिपिक व चपराशी म्हणूनही जबाबदारी पार पाडली. मुख्याध्यापक सत्येन राघोर्ते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षिका हेमलता भगत, वर्षा सिरसाट व प्रमुख वक्ते बाबुराव घाटोळ उपस्थित होते. श्रावणी वसुले, प्रिनल दातीर, अंशुमन भडके, गोविंद खांदेल व हर्षद पवार यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. ज्येष्ठ शिक्षक प्रमोद पारवे व मिलिंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. सूत्रसंचालन भक्ती ठाकरे व नेहा वरहेकर, प्रास्ताविक माहेश्वरी जाधव, तर यावेळी आभार मनस्वी अंबाडकर हिने मानले.
Source link
शिक्षकदिन साजरा:विद्यार्थ्यांनी सांभाळला कारभार, 50 विद्यार्थ्यांनी स्वीकारली शिक्षकांची जबाबदारी