Headlines

1100 भरणे, तीन टनांच्या कावडीसाठी ‘थ्री-स्टेज’ यंत्रणा, समन्वयासाठी वॉकी-टॉकीचा वापर; 3 टनाच्या कावडीत 11 कप्पे, बांधणीसाठी अडीच क्विंटल दोरी‎


.

शहरातील कावड उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणाऱ्या डाबकीरोडवासी कावड उत्सव समितीच्या तब्बल तीन टन वजनाच्या आणि ११०० स्टिलच्या भरण्यांनी सजलेल्या महाकावडीच्या सुरक्षित संचालनासाठी विशेष ‘थ्री-स्टेज’ नियंत्रण यंत्रणा उभारण्यात आली आहे.

कावडीचा प्रचंड भार व लांबीमुळे रस्त्यावरील गर्दी आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी ही त्रिस्तरीय सुरक्षा व समन्वय व्यवस्था कार्य करते. गर्दीत संपर्क तुटू नये, यासाठी स्वयंसेवक वॉकी-टॉकीद्वारे जोडले गेले असून ते ११०० भरण्यांची लांब व जड कावड खांद्यावर वाहणाऱ्या शिवभक्तांपर्यंत वेळोवेळी योग्य संचालनासाठी संदेश पोहोचवते. यामुळे ही प्रचंड कावड नियंत्रणास मदत होते. ^आमच्या कावड उत्सवात कठोर शिस्त व सर्वधर्मसमभाव पाळला जातो. सर्व धर्म व जातींमधील नागरिक खांद्याला खांदा लावून यात सहभागी होतात. पक्षभेद विसरून विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी केवळ ‘शिवभक्त’ म्हणून सेवा बजावतात. गांधीग्राम प्रवासासाठी सर्वांना १५ ते २० ट्रकमधून एकत्र नेले जाते. तेथे अध्यक्ष , कार्यकर्ता, सर्वांना समान वागणूक दिली जाते. – संदीप पवार, मुख्य व्यवस्थापक, डाबकीरोडवासी कावड उत्सव समिती. {बांधणीसाठी अडीच क्विंटल दोरी, ११०० भरण्यांचा भार पेलण्यासाठी रचना विशेष कौशल्याने करण्यात आली.

थ्री-स्टेज यंत्रणा अशी स्टेज १ (अग्रभागी मार्ग शोधक) : कावड पुढे सरकताना रस्त्यावरील वाहतूक, वीजवाहिन्या आणि गर्दी मोकळी करण्यासाठी स्वयंसेवकांची पहिली तुकडी ५० मीटर पुढे चालते. स्टेज २ (प्रत्यक्ष तोल सांभाळणारे) : तीन टन वजनाची कावड उचलण्यासाठी व तिचा तोल सांभाळण्यासाठी ११ गाल्यांमध्ये विभागलेले प्रशिक्षित तरुण प्रत्यक्ष कावडीसोबत असतात. स्टेज ३ (सुरक्षा व आणीबाणी सपोर्ट) : कावडी मागे वैद्यकीय मदत, पिण्याचे पाणी, स्वयंसेवकांची तिसरी फळी असते.

कावड यात्रेत धर्मसमभावासह शिस्त



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *