![]()
उत्तर मुंबई भाजप आणि महायुतीच्या वतीने ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि खासदार पीयूष गोयल यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीत भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. विरोधकांकडून पसरवण्यात येणाऱ्या कथित खोट्या नरेटिव्हचा निषेध करण्यासाठी ही रॅली काढण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. स्वामी विवेकानंद पुतळा, गोराई-गांधी चौक, बोरीवली पश्चिम येथून रॅलीला सुरुवात झाली. ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ आणि ‘देश का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान’ असे संदेश असलेले फलक हातात घेऊन महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. वकील, डॉक्टर, विविध महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी संघटनांचे सदस्य आणि देशभक्त नागरिकांचाही यात सहभाग होता. महावीर नगर, कांदिवली पश्चिम येथील सप्ताह मैदानावर विशाल जनसभेने रॅलीचा समारोप झाला. या रॅलीला खासदार पीयूष गोयल यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार गोपाळ शेट्टी, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार योगेश सागर, आमदार अतुल भातखळकर, आमदार मनीषा चौधरी, आमदार संजय उपाध्याय, आमदार प्रकाश सुर्वे, सभागृह नेते गणेश खणकर, प्रकाश दरेकर, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष दीपक (बाळा) तावडे, मुंबई भाजप सरचिटणीस विनोद शेलार, रिपब्लिकन पक्षाचे रमेश गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इंद्रपाल सिंह यांच्यासह विविध पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष दीपक (बाळा) तावडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांचे आभार मानत विरोधकांकडून ईव्हीएम, मतचोरी, संविधानाला धोका आणि परीक्षांचे पेपरफुटी यांसारखे मुद्दे उपस्थित करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला. ‘महाराष्ट्राच्या भूमीवर अराजकता पसरू देणार नाही’ पीयूष गोयल यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर अराजकता पसरू देणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कामांचा उल्लेख करत त्यांनी विरोधकांवर टीका केली. मतदार यादी आणि विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेबाबत बोलताना गोयल यांनी विरोधकांना सवाल केला. देशात अनधिकृतपणे राहणाऱ्या लोकांना का सहन करायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच एकाच व्यक्तीचे नाव तीन वेगवेगळ्या ठिकाणी मतदार यादीत असू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले. राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीकास्त्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरूनही गोयल यांनी नाराजी व्यक्त केली. अशा अपशब्दांचा वापर केल्याबद्दल देशातील जनता खरगे आणि राहुल गांधी यांना कधीही माफ करणार नाही, अशी टीका त्यांनी केली. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि संविधानावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असल्याचा उल्लेख करत राहुल गांधी बिथरल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसचे नेतृत्व दिशाहीन आणि नेतृत्वविहीन झाल्याची टीका करत गोयल यांनी निवडणुकीतील विजय-पराजयाचा संदर्भ दिला. काँग्रेस ज्या वेळी निवडणुका जिंकते, त्या वेळी त्यांनी मतचोरी केली होती का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. या रॅलीच्या माध्यमातून विरोधकांच्या कथित खोट्या नरेटिव्हविरोधात जनतेने आपला निषेध व्यक्त केला असल्याचे गोयल यांनी सांगितले. आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. हेही वाचा…. 2019 नंतर काही जणांचे फोन थांबले, आजही सुरू नाहीत:संजय राऊतांच्या ‘बोध कीर्तन’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या पत्रकारितेतील प्रवासाच्या आठवणी सांगितल्या. तसेच मराठी भाषा, वाचनसंस्कृती, विचारशक्ती आणि सध्याच्या सामाजिक परिस्थितीवरही आपली भूमिका मांडली. भाषणादरम्यान त्यांनी काही जणांचे फोन 2019 नंतर बंद झाल्याचा उल्लेख केला. “काही जणांचा फोन 2019 पासून थांबला, तो थांबलाच. तो फोन काही त्यांनी होणार नाही,” असे म्हणत त्यांनी राजकीय संदर्भातून टोला लगावला. सविस्तर वाचा….
Source link
उत्तर मुंबईत भाजप महायुतीची ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ रॅली:पीयूष गोयल यांचा राहुल गांधी, काँग्रेसवर निशाणा