Headlines

‘क्राइम सीन’ री-क्रिएशन- रस्त्यावर गर्दी:विद्यार्थिनीच्या मारेकऱ्याला पोलिसांनी घटनास्थळावरुन फिरवले, चित्रीकरणही केले‎




शहरातील रवीनगर चौकात एका साडेसतरा वर्षीय मुलीची आनंद भड या तरुणाने गळा चिरुन व तीच्या शरीरावर चाकूने घाव करुन निघृणपणे हत्या केली. पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने ८ सप्टेंबरपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान घटनेच्या दिवशी मारेकरी आनंद याने ज्या पद्धतीने सकाळपासून हालचाली केल्यात, त्या संपूर्ण हालचालींबाबत राजापेठ पोलिसांनी शनिवारी (दि. ५) सायंकाळी ‘क्राइम सीन रिएक्रिएशन’ करत मारेकऱ्याला रस्त्यावर फिरवले. या मारेकऱ्याला रवीनगर चौकातील घटनास्थळी आणले असता हजारो नागरीक त्याला पाहण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. राजापेठचे ठाणेदार संदीप चव्हाण हे पुरेशा पोलिस ताफ्यासह मारेकऱ्याला घेवून शनिवारी दुपारी साडेतीन वाजता शहरातून निघाले. त्यानंतर ४२ किमी अंतरावरील आनंदच्या गावात पोही येथे पोहचले. पोहीवरुन तो मान्यात ज्या दुकानात गेला होता, तेथे नेले. त्याने माना येथील एका दुकानातून चाकू खरेदी केला होता. तेथून त्याला घेवून पोलिस बडनेरा व तेथून रवीनगर घटनास्थळी पोहचले. शनिवारी क्राइम सीन रिक्रिएशन करण्यापुर्वी राजापेठ पोलिसांनी आरोपीची दुचाकी बडनेरा ठाण्यातून जप्त केली. घटनेच्यादिवशी तो मृतक विद्यार्थीनीच्या रवीनगर स्थित कॉलेजमधील पार्किंगमध्ये शिरला होता. मात्र तेथे मुलीची दुचाकी न दिसल्यामुळे तो मुलीच्या घराकडे गेला होता. त्याला रविनगर पुलावर आणले. तेथे नेल्यानंतर त्याने खुनाचा घटनाक्रम विषद केला. बडनेरा ठाण्यातून दुचाकी केली जप्त



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *