Headlines

श्री शहाजी प्रशालेत विद्यार्थ्यांना शालेय कामकाजाची अनुभूती




येथील मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेला १३९ वर्षाची ऐतिहासिक परंपरा असून या प्रशालेत तुम्ही शिक्षण घेत आहात ही भाग्याची गोष्ट आहे. शाळा व शिक्षक जीवनाला आकार देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्याचा आपण सकारात्मक उपयोग करून घ्यावा, असे उदगार मुख्याध्यापक वाय.पी.कबाडे यांनी काढले. येथील मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेत शिक्षक दिनाचे औचित्य विद्यार्थी शिक्षक दिन उपक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक वाय.पी.कबाडे, एम. बी. मुन्नोळी, ए.एस.कोरे, एस. व्ही. गोडसे, आर. एम. इंगळे, जे. एस. बगले, ए. बी.शिंदे , मुख्याध्यापक मनस्वी कुलकर्णी, उपमुख्याध्यापक भागवंती देसाई, पर्यवेक्षक समीक्षा भांगरे, संस्कृती पगुडवाले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थी क्रीडा शिक्षकाने शालेय प्रार्थना घेतली. इयत्ता सातवी व इयत्ता दहावी मधील विद्यार्थिनींनी विद्यार्थी शिक्षक म्हणून शाळा चालवली. यामध्ये सर्व शालेय कामकाजाची माहिती घेतली. उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थी शिक्षक यांचा भेटवस्तू व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *