.

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त पांगरी (ता. बार्शी) येथील सदाशिवबुवा मठ, बाजारपेठ येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची शनिवारी (दि. ५) काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात सांगता झाली. सप्ताहानिमित्त गावातून काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीमध्ये भाविक सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि विठ्ठल नामस्मरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. सप्ताहाच्या कालावधीत दररोज पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, दुपारी भोजन पंगत, सायंकाळी हरिपाठ, पोथी वाचन तसेच रात्री कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांना पांगरीसह पंचक्रोशीतील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सप्ताहाच्या सांगतेनिमित्त सकाळी गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. पालखीमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी ठेवून पारंपरिक वाद्यांच्या गजरात दिंडी गावातील प्रमुख मार्गावरून मार्गस्थ झाली. महिला, पुरुष, युवक तसेच बालकांनी दिंडीत सहभागी होत भक्तिमय वातावरण निर्माण केले. यानंतर मोरे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. कीर्तनातून श्रीकृष्णाच्या बाललीला, भक्तीचे महत्त्व आणि नामस्मरणाचा संदेश भाविकांना देण्यात आला. कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
प्रतिनिधी | मंगळवेढा सुखदेवानी राजा परीक्षितीला भगवंताच्या गुणाचे वर्णन करून सात दिवसात कसा उद्धार झाला हे सांगत,श्रीमद् भागवत कथा श्रवणाने त्रिविध ताप निघून जातात आणि मनाला चिरशांती येथे जीवाचा उद्धार होतो असे मत हभप सुरेश शिरवळकर महाराज अकोला यांनी व्यक्त केले. ते सुरेश शिरवळकर महाराज अकोला यांची भागवत कथा संपन्न झाली, त्याप्रसंगी बोलत होते. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मौजे ब्रह्मपुरी येथे श्रावण कृष्ण प्रतिपदा ते श्रावण कृष्ण नवमी पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. आबासाहेब देशमुख शिरगावकर म्हणाले, सामान्य जीवाचा धंदा संताचा धंदा आणि देवाचा धंदा कसा असतो यातील वर्ण मांडले धंदा पण सामान्य जीवाचा धंदा संताचा धंदा आणि देवाचा धंदा याचं वर्म सांगितले, श्रीकृष्णाच्या जन्मापासून अंतापर्यंत संघर्षासनी त्यांनी विचाराने परिस्थितीवर मातकरी कशी केली हे विशद केले. काल्याचे कीर्तन करकंब येथील श्रीकांत आरोळे महाराज यांनी केले, त्याप्रसंगी ते म्हणाले , जीवनात रामाचा उच्चार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार आवश्यक आहे. सांगता सप्ताहात सुरेश पाटील, अनिल पाटील, गजानन देशमुख, राजश्री पंडित, कृष्णदेव मोरे,औदुंबर पाटील, महादेव सोलंकर, सदाशिव स्वामी, सुभाष देशमुख, गोपाळ पुजारी व अमर दिनकर पाटील, संदीप पाटील यांनी अन्नदान
अशोक महाराज मोरे म्हणाले, कधी युगात माणूस दर्शनापेक्षा प्रदर्शनाच्या पाठीमागे लागला आहे, नदी स्नान करायला लाज वाटते आणि स्विमिंग पूलमध्ये पोहोण्याला फॅशन वाटते, गरिबाला दान देत नाही, पण वेटरला टीप देण्यात मोठेपणा वाटतो पंगतीत बसून जेवण करण्यास लाज वाटते. आणि पार्टीत खाण्यासाठी रांग लावण्यात छान वाटते तेव्हा मायावी जगाच्या मोहात पडू नका आईबाप हे दैवत आहेत त्यांना सांभाळा त्यांची काळजी घ्या. निर्देशनी रहा नाती सांभाळा, नाती सांभाळण्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत तर वेळ आणि प्रेम द्यावे लागते अंत:करण द्यावे लागते. भगवंत प्रेमाचा भुकेला आहे, जिथे भाव आहे तिथेच देव आहे.