Headlines

अर्बन इनव्हायरोकडे वर्षासाठी ठेका:15 दिवसांत नव्या कंत्राटानुसार कचरा संकलन; कार्यादेश जारी, 4,802 रुपये प्रतिटन दराने होणार काम‎




शहरातील घराघरातून कचरा संकलन आणि त्याची वाहतूक करण्यासाठी महापालिकेने निवडलेल्या कंत्राटदाराला कार्यादेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांत नव्या करारानुसार शहरातील कचरा संकलन व्यवस्था सुरू होणार आहे. मे. अर्बन इनव्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड, नागपूर या कंपनीला पाच वर्षांसाठी कंत्राट देण्यात आले आहे. काम समाधानकारक असल्यास कंत्राटाचा कालावधी आणखी दोन वर्षांनी वाढवता येणार आहे. महापालिकेने कचरा संकलन व वाहतुकीसाठी तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबवली होती. त्यात अर्बन इनव्हायरोची निविदा प्राप्त झाली. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर दि. ४ सप्टेंबर रोजी कार्यादेश देण्यात आला आहे. ४,८०२ रुपये प्रतिटन दराने कचरा संकलन होणार आहे. करारातील अटींनुसार येत्या पंधरा दिवसांत काम सुरू होईल. शहरातील २० प्रभागांमधील कचरा संकलन, त्याची वाहतूक, नाले व खुल्या भूखंडांवरील कचरा, भाजी बाजारातील कचरा उचलला जाणार आहे. निविदेनुसार कचरा संकलन व वाहतुकीसाठी एकूण २७० वाहने आवश्यक आहेत. त्यामध्ये २१२ इलेक्ट्रिक घंटागाड्या, २० ट्रॅक्टर व ट्रॉली, १२ रिफ्युज कॉम्पॅक्टर, चार लोडर, दोन ट्रक टिपर यांचा समावेश आहे. कंत्राटदाराला वाहनांची देखभाल, इंधन, चालकांचे वेतन व इतर संबंधित खर्च स्वतः करावा लागणार आहे. यंत्रसामग्री सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी कंत्राटदारावर राहणार आहे. वाहनांच्या नियंत्रणासाठी ई-घंटागाड्यांना ‘जीपीएस’: वाहनांच्या नियंत्रणासाठी ‘जीपीएस’ यंत्रणा कार्यान्वित ठेवावी लागणार आहे. कचरा संकलनाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी ही यंत्रणा वापरली जाणार आहे. प्रत्येक प्रभागात वाहने कचरा संकलनासाठी पोहोचतात का, याचीही माहिती उपलब्ध होणार आहे. कंपनीला ४,८०२ रुपये प्रतिटन दर – कचरा संकलनासाठी ४ हजार ८०२ रुपये प्रतिमेट्रिक टन प्रमाणे पैसे दिले जाणार आहेत. स्थायी समितीसमोर या कामासाठी वर्षाला सुमारे ३५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती देण्यात आली होती. चार कॉम्पॅक्टरची खरेदी करणार महापालिकेकडे सध्या ८ रिफ्युज कॉम्पॅक्टर उपलब्ध असून, आणखी ४ कॉम्पॅक्टर खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नव्या कंत्राटानुसार कंत्राटदाराला १२ कॉम्पॅक्टर मनपा उपलब्ध करुन देणार आहे. कॉम्पॅक्टर खरेदीला मंजूरी मिळाली असून, लवकरच खरेदी केली जाणार आहे. यामुळे शहरातील कचरा संकलन करण्यासाठी मोठी मदत मिळेल. ^नव्या कंत्राटानुसार कचरा संकलन व्यवस्था १५ दिवसांत सुरु होईल. कचरा संकलनासाठी कंत्राटदाराला ४ हजार ८०२ रुपये प्रतिमेट्रिक टन प्रमाणे पैसे दिले जाणार आहे. कचरा संकलन, वाहतूक, प्रक्रिया केंद्रापर्यंत कचरा पोहोचवण्याची जबाबदारी कंत्राटदारावर आहे. -प्रशांत राजुरकर, स्वच्छता विभाग प्रमुख, मनपा पंधरा िदवसांत सुरू होईल काम दररोज २५० ते २६० टन कचरा होते तयार शहरातील कचऱ्यावर भोड येथील प्रक्रिया केंद्रावर प्रक्रिया केली जाते. हे केंद्र मनपा मुख्यालयापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर आहे. उचलेला कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. दररोज सुमारे २५० ते २६० टन कचरा निर्माण होतो. शहराचे क्षेत्रफळ सुमारे १२८ चौरस किलोमीटर असून २० प्रभागातून कचरा संकलन करावे लागेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *