![]()
अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून शेतातील साहित्य, इलेक्ट्रिक मोटर पंप आणि केबल चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. या चोऱ्यांमुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अंजनगाव सुर्जी पोलिसांनी शेती साहित्य आणि केबल चोरी करणाऱ्या टोळीचा माग काढला. यावेळी पोलिसांनी चोरीचा माल चोरट्यांकडून खरेदी करणाऱ्या तीन आरोपींना पकडले आहे. मात्र मुख्य चोरटा अजूनही पसार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार सुरज बोंडे यांच्या पथकाने ३ सप्टेंबरला टाकरखेडा नाका येथे नाकाबंदी करून एका संशयास्पद मालवाहू वाहनाची तपासणी केली. या वाहनात मोठ्या प्रमाणावर चोरीचे तांब्याचे व ॲल्युमिनियमचे तार आणि महावितरणचे साहित्य मिळून आले. मोहम्मद सुफियान अब्दुल कादिर (२५), मोहम्मद साजीद ताज मोहम्मद (४५, दोघेही रा. काझीपुरा, अंजनगाव सुर्जी) आणि शेख समीर शेख बशीर (२४, रा. अंजनगाव सुर्जी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून एकूण ५,७२,५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यासोबतच २.८० लाखांचे वाहन, मोटरमधील कापलेले तांबे १५६ किलो, बोअरवेलमधील तांब्याचे तार, डीपीमधील तांब्याच्या पट्ट्या व पाण्याच्या मोटरचे साहित्य, महावितरणच्या खांबावरील व जाळलेली ॲल्युमिनियम तार, पितळी स्प्रिंकलर व नोझल या मुद्देमालाचा जप्तीमध्ये समावेश आहे. या त्रिकुटाने चोरट्यांकडून ८ ते ९ चोरीमधील मुद्देमाल विकत घेतला आहे. त्यामुहे अंजनगाव ठाण्यात दाखल असलेले केबल व शेती साहित्य चोरीचे आठ ते नऊ गुन्हे उघडकीस येत आहेत. प्राथमिक तपासात अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीवरील केबल व मोटरचे सुटे भाग या साहित्यात आढळले आहेत. घटनेतील मुख्य चोरटा अद्याप फरार असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. सदर कामगिरी एसपी निकेतन कदम, ठाणेदार सुरज बोंडे, एपीआय अनिल चांदोरे, पीएसआय भारत चिरडे, विशाल पोळ, रवी राठोड, आकाश रंगारी, अमित घाटे व मोहसिन पठाण यांनी केली आहे. ^आमच्या भागात शेती साहीत्यांच्या चोरी घटनांना आळा घालण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहे. दरम्यान आम्ही पकडलेले त्रिकुट हे शेती साहीत्य चोरट्यांकडून चोरीचे साहीत्य खरेदी करतात, अशी माहीती मिळाली होती. त्यांना अटक करुन जवळपास आठ ते नऊ गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला असून मुख्य चोरट्याचा शोध सुरू आहे. त्यालाही लवकरच पकडण्यात आम्हाला यश येणार आहे. – ठाणेदार सुरज बोंडे, अंजनगाव सुर्जी. मुख्य चोरट्याला लवकरच पकडू; त्यालाही पकडण्यात यश येणार
Source link
चोरीचे शेतीसाहित्य खरेदी करणारे ‘त्रिकूट’ गजाआड:पोलिसांनी जप्त केला 5.72 लाखांचा मुद्देमाल