Headlines

राज्यातील 4 शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार:शिक्षकदिनी राष्ट्रपतींकडून बीड, लातूर, नाशिक व साताऱ्यातील शिक्षकांचा सन्मान




शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशभरातील ८२ शिक्षकांना नवी दिल्ली येथे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केले. यात महाराष्ट्रातील बीड, लातुर, नाशिक व साताऱ्यातील एकुण ४ शिक्षकांनी आपल्या अभिनव प्रयोगांनी देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांना कोडिंग शिकवण्यापासून ते महापालिका शाळेतील मुलांना थेट अमेरिकेशी जोडण्यापर्यंतचे हे प्रयोग शिक्षण क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरले आहेत. या चारही शिक्षकांच्या कार्याचा हा खास आढावा… लातुरातील गणिताचे जादुगार शिक्षक वैभव कुलकर्णी जवाहर नवोदय विद्यालयातील या शिक्षकाने क्रीडा आणि खेळण्यांच्या माध्यमातून गणिताची भीती दूर केली. डिजिटल क्रांतीचा स्वीकार करत त्यांनी ‘मॅथ्स मेड इझी विथ वैभव कुलकर्णी’ या आपल्या यूट्यूब वाहिनीवरून ७०० हून अधिक शैक्षणिक व्हिडिओंची निर्मिती केली. तसेच कमी खर्चातील अध्यापन साहित्याद्वारे ८०० शिक्षकांना प्रशिक्षित करून शाळेच्या १०० टक्के निकालाची परंपरा राखली. नाशिकच्या उपक्रमशील शिक्षिका कुंदा बच्छाव आनंदवली येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यामंदिर (महापालिका शाळा क्रमांक १८) येथे कार्यरत कुंदा बच्छाव यांनी कुंदा बच्छाव यांनी ‘जॉयफुल स्टेम’, ‘ज्ञानभिंती’ आणि ‘ई-ट्विनिंग ते इस्रो’ यांसारखे उपक्रम राबवले. ‘ई-ट्विनिंग’ या उपक्रमामुळे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना थेट अमेरिकेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची अद्भूत संधी मिळाली. मोबाईल मुक्ती अभियान राबवून मुलांचे मन वाचनाकडे वळवले. तसेच समाजमाध्यमांतून निधी उभारत आर्थिकदृष्ट्या दुर्बल १५० मुलींची शाळागळती रोखली. साताऱ्याचे प्रयोगशील शिक्षक शिवप्रसाद टिंगरे सैनिक शाळेमध्ये विज्ञान विषयासाठी शून्य खर्चात अध्ययन सुलभ पुनरावर्तन प्रारूप विकसित केले. विद्यार्थ्यांनी नुसत्या कल्पना न मांडता प्रत्यक्ष प्रोटोटाइप बनवावेत यासाठी त्यांनी प्रेरित केले. यातूनच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या न्यूट्रिस्टोव्हला थेट पेटंट मिळाले आहे. ऊसतोड मजुरांच्या मुलांना प्रवाहात आणणाऱ्या डॉ. गित्ते केज येथील साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. कविता गित्ते-कराड यांनी गेल्या २९ वर्षांपासून ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्य केले. सहावीपासून कोडिंग, रोबोटिक्स व एआयचे धडे दिले. शिक्षणासोबतच क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम, विविध स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षा, पर्यावरण संवर्धन यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभागासाठी प्रोत्साहन दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *