पारंपरिक वाद्याच्या गजरात गणरायाची निघेल मिरवणूक:सण शांततेत करावेत, अक्कलकोट उपविभागाची शांतता समिती नियोजन बैठक उत्साहात
यंदाही डीजेमुक्त वातावरणात भक्तिमय वातावरणात पारंपरिक वाद्यांच्या सोबत उत्सव शांततेत साजरा करा. कायदा हा सगळ्यासाठी सारखा असतो. फाटे न फोडता समाजशील व्यक्ती बना. येणारे सर्वच सण शांततेत साजरे करावे, असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी केले . गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले….