Headlines

उजनीच्या पाण्यासाठी एल्गार; डेटा सेंटरविरोधात शेतकरी-मच्छीमारांचा लढा:करमाळा तालुक्यातील केतुरमध्ये संयुक्त बैठक; शेती आणि रोजगाराच्या संरक्षणासाठी 31ऑक्टोबरला भीमानगर-रांजणी पुलावर रास्ता रोको



उजनी धरणावर प्रस्तावित असलेल्या एआय डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध करण्यासाठी करमाळा तालुक्यातील केतुर येथे शेतकरी आणि मच्छीमार बांधवांची बैठक घेण्यात आली. या प्रकल्पामुळे उजनीच्या पाण्यावर, शेतीवर आणि मच्छीमारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची भीती बैठकी

.

सर्व शेतकरी आणि मच्छीमार संघटनांच्या संयुक्त विद्यमाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उजनीच्या पाण्याचा वापर, स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या, मच्छीमारांचा रोजगार आणि प्रस्तावित प्रकल्पाचे संभाव्य परिणाम यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीचे प्रास्ताविक उदयसिंह खाटमोडे पाटील यांनी केले. उजनी धरण हे शेतकरी आणि मच्छीमार बांधवांसाठी जीवनदायिनी असून, या धरणाच्या पाण्यावर शेतीसह अनेक कुटुंबांचा रोजगार अवलंबून आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर वीज आणि पाणी लागणारा एआय डेटा सेंटर प्रकल्प उभारल्यास स्थानिकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

यावेळी नंदूशेठ नगरे आणि ॲड. अजित विघ्ने यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रस्तावित प्रकल्पामुळे पर्यावरण आणि शेतीवर होणाऱ्या संभाव्य परिणामांकडे त्यांनी लक्ष वेधले. स्थानिक शेतकरी आणि मच्छीमारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी एकजुटीने लढा देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच, या प्रश्नावर कायदेशीर मार्गानेही लढा देण्याची भूमिका मांडण्यात आली. बैठकीस केतुर पंचक्रोशीतील शेतकरी, मच्छीमार संघटनांचे पदाधिकारी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उजनीवरील प्रस्तावित प्रकल्पाला विरोध करण्यासाठी एकत्रितपणे आवाज उठवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे केले आवाहन उजनीचे पाणी, शेती आणि मच्छीमारांचा रोजगार यांचे संरक्षण करण्यासाठी ३१ ऑक्टोबर रोजी भीमानगर-रांजणी पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकरी आणि मच्छीमार बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *