![]()
गणेशपेठ परिसरातील गीता मंदिरासमोरील म्हाडा कॉलनी (टेक्स्टाईल पार्क) येथे कमर्शियल गाळ्यांच्या बांधकामादरम्यानशुक्रवारी (३० ऑक्टोबर) सकाळी १०:३० ते ११:०० वाजेच्या सुमारासटॉवर क्रेन कोसळून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात दोन मजुरांचामृत्यू झाला असून, दोन जण जखमीझाले आहेत. बांधकामस्थळी ४०मीटर (अंदाजे १३० फूट) उंच क्रेनचीआणखी उंची वाढवण्याचे काम सुरूअसताना अचानक तोल जाऊन तीवाकून खाली कोसळली. या दुर्घटनेतउंचावरून खाली फेकल्या गेल्यानेक्रेनचालक विश्वनाथ कठाणे (वय४०, रा. गोंदिया) आणि मजूर मुकेशनिशाद (वय २५, रा. जौनपूर, उत्तरप्रदेश) यांचा मृत्यू झाला. तर मंतुराम(वय २६) व महेश मिस्त्री (वय २८,दोघेही रा. बलरामपूर, छत्तीसगड) हेजखमी झाले असून, त्यांनाउपचारासाठी खासगी रुग्णालयातदाखल करण्यात आले आहे. त्यांचीप्रकृती स्थिर आहे. अपघाताची माहिती मिळताचगणेशपेठ पोलीस आणि अग्निशमनदलाचे पथक घटनास्थळी दाखलझाले. क्रेनच्या वरच्या भागातअडकलेल्या मंतुराम या मजुरालासिव्हिल अग्निशमन केंद्रातीलकर्मचारी गणेश राजुरकर व निलेशठेठे यांनी स्ट्रेचरच्या साहाय्याने खालीउतरवून रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयातपोहोचवले. या प्रकल्पासाठी बी.जे. शिफ़्के कंपनीचे विवेक पगारेप्रोजेक्ट मॅनेजर तर रामजी प्रजापतीक्रेन ऑपरेटर म्हणून कार्यरत होते.क्रेनची उंची वाढवताना ही दुर्घटनानेमकी कोणत्या तांत्रिक कारणामुळेघडली, याची चौकशी सुरू आहे.
Source link
म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळली:नागपुरात दोन मजुरांचा मृत्यू, तीन जखमी