![]()
येथील बहुतांश व्यापारी मुंबई येथूनच मालखरेदी करतात. परंतु, पैठण आगाराच्या कारभारामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याने पैठण-मुंबई बस पूर्वीच्या वेळापत्रकानुसार व जुन्या मेगा हायवे मार्गानेच सुरू करण्याची मागणी व्यापारी महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पूर्वी ही बस मेगा हायवेने जात असताना प्रवाशांना १० ते ११ तास लागत होते. मात्र, ही गाडी खोपोली मार्गे वळवल्यामुळे आता प्रवाशांना १२ ते १४ तासांचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवासी पैठणहून शेवगाव येथे जाऊन तेथून शेवगाव-मुंबई बसने जाणे पसंत करत आहेत. या बसची मुंबईहून पैठणकडे निघण्याची वेळ पूर्वी सायंकाळी ०७:०० वाजता होती, ती बदलून आता ५:४५ वाजता केली आहे. मुंबईत गेलेल्या व्यापाऱ्यांना व सर्वसामान्यांना कामे आटोपून परतीचा प्रवास करणे अशक्य झाले आहे. या प्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष स्वदेश पांडे, सचिव उमेश तट्टू, माजी अध्यक्ष पवन लोहिया, अमोल धस, योगेश लोहिया, चैतन्य परदेशी, गुरुदत्त करकोटक, कुणाल खताडे व बाळासाहेब पठाडे यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.
Source link
पैठण-मुंबई बस पूर्ववत वेळेत, मेगा हायवेमार्गे सुरू करण्यासाठी साकडे:व्यापारी महासंघाकडून एसटी महामंडळाच्या पैठण आगारप्रमुखांना निवेदन