Headlines

संकल्प, जिद्द, शिस्तीने यशाचा मार्ग सुकर होतो:कन्नड येथे प्राचार्य संतोष मतसागर यांचे प्रतिपादन




संकल्प, जिद्द, शिस्त आणि सातत्य यामुळे यशाचा मार्ग सुकर होतो. सामान्य माणसेही अभ्यासाच्या ध्यासाने असामान्य कार्य करू शकतात, असे प्रतिपादन प्राचार्य संतोष मतसागर यांनी केले. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक कॉलेज, कन्नड येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी, वेळेचे नियोजन आणि अभ्यासातील सातत्याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमप्रसंगी परिवीक्षाधीन उपविभागीय अधिकारी आरती पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वाहतुकीचे नियम आणि मोबाईलच्या योग्य वापराबाबत मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, नियमित अभ्यास आणि आत्मविश्वासाने ध्येय साध्य करावे. सोशल मीडियाचा अतिवापर टाळून शैक्षणिक कामांसाठीच त्याचा वापर करावा. अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे सरचिटणीस प्रसन्न पाटील यांनी विद्यार्थ्यांना आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवून शिक्षण व संस्कारांच्या माध्यमातून प्रगती करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रसाद वाघ यांनी केले, तर आभार प्रा. महेंद्रसिंग राजपूत यांनी मानले. या प्रसंगी डॉ. शरद गावंडे, विभागप्रमुख प्रा. प्रमोद गडपायले, प्रा. श्रीराम काळे, प्रा. आशिष गावंडे, प्रा. नवनाथ चव्हाण, प्रा. गोपाल दाभाडे, प्रा. इकरम पठाण, प्रा. शशांक मेखे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *