![]()
ढोरेगावजवळील शिवना नदीच्या पुलावर गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कंटेनरने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याची घटना घडली. यात कंटेनर चालकाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. सळई वाहतूक करणारा कंटेनर (एमएच १४ एलबी ७९७७) अहिल्यानगरच्या दिशेने जात असताना शिवना नदीच्या पुलावर समोरील ट्रकला (यूपी ७२ सीटी ७४३५) पाठीमागून धडकला. यात कंटेनर चालक प्रज्वल आंधळे गंभीर जखमी झाला. नागरिकांनी मदतकार्य करत त्याला बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे महामार्गावर ३ ते ४ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. खड्डे ठरत आहेत जीवघेणे शिवना पुलावर पडलेले खड्डे अपघातांना निमंत्रण देत असून, यापूर्वीही येथे अनेक अपघात घडले आहेत. कंत्राटदार व महामार्ग प्रशासनाने या पुलावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
Source link
ढोरेगाजवळ कंटेनर- ट्रकचा अपघात; चालक गंभीर, 3 तास वाहतूक ठप्प:छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर महामार्गावर वाहनांच्या 3 किमी रांगा