![]()
शेतात ट्रॅक्टरचे काम सुरू असताना पुढे हेडवर बसलेल्या तरुणाचा तोल जावून तो खाली पडला आणि ट्रॅक्टरचे मोठे चाक त्याच्या डोक्यावून गेले. क्षणात चाकाखाली चिरडला गेल्यामुळे २९ वर्षीय श्रीमंत मच्छिंद्र पवार या तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अहमदपूर तालुक्यातील टेंभुर्णी येथील बाळासाहेब माधवराव सोळंके यांच्या शेतात घडली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक दिलीप रुखू राठोड (वय ३२, रा. गणेशपुरी, गेमानाईक तांडा, ता. कमालनगर, जि. बीदर, कर्नाटक) याच्याविरुद्ध अहमदपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीमंत पवार हा दिलीप राठोड याच्यासोबत ट्रॅक्टरवर बसला होता. राठोड हा ट्रॅक्टर (क्रमांक केए ३८ टी ५३४९) चालवत असताना त्याने वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचा ठपका चालकावर ठेवण्यात आला आहे. या संदर्भात गणेश थारू पवार (वय ५१, रा. गंगणबीड तेजानाईक तांडा, ता. कमालनगर, जि. बीदर) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अहमदपूर पोलिसांत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८१ व १०६(१) नुसार गुन्हा क्रमांक ७२२/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
Source link
ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने तरुणाचा मृत्यू:अहमदपूर तालुक्यातील टेंभुर्णी येथील घटना