Headlines

मोदींबद्दल अभद्र भाषा वापरणारे खड्ड्यात गेले:बाळासाहेब असते तर मोदी-शहांना शाब्बासकी दिली असती, भाजपच्या लोकतंत्र बचाव यात्रेतून शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल ज्या ज्या वेळी विरोधकांनी अभद्र भाषा वापरली, त्या त्या वेळी विरोधक खड्ड्यात गेले आहेत. देशातील जनतेला हे वर्तन अजिबात पटत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे कलम 370 हटवण्याचे आणि भव्य राम मंदिर उभारण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पूर्ण केले. आज जर बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली असती, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या ‘लोकतंत्र बचाव यात्रे’त ते बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले की, आपल्या देशात बांगलादेश, नेपाळ किंवा श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण होईल, असे विरोधक सातत्याने म्हणत आहेत. पण आपला देश म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका किंवा नेपाळ नाही. हा शत्रूंच्या घरात घुसणारा नवा भारत आहे. पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना गुडघ्यावर आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. दुर्दैवाने, विरोधक आपल्या सैन्याच्या शौर्यावरही संशय घेत आहेत. सरन्यायाधीशांचा राजीनामा मागणे हा संविधानाचा अपमान एकनाथ खडसे म्हणाले की, मुख्य न्यायाधीशांचा राजीनामा विरोधक कसा काय मागू शकतात? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत विचारपूर्वक संविधानिक संस्थांची निर्मिती केली आहे. त्यांचा राजीनामा मागणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानाचा अपमान नाही का? तुम्ही सर्वोच्च न्यायालयावर चाल करून जाता, हा न्यायालयाचा अवमान आहे. जब तक सुरज चांद रहेगा, तब तक भारत का संविधान रहेगा. विरोधकांना देशात अराजकता निर्माण करायची आहे, म्हणूनच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर मोर्चे आणि आंदोलने करत आहेत. मात्र, देशातील 140 कोटी जनता पंतप्रधान मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. इतर देशांमध्ये आर्थिक परिस्थिती बिघडत असताना भारताची अर्थव्यवस्था अधिक बळकट झाली आहे. पंतप्रधानांचा बाप काढून केलेले पाप कुठे फेडाल? एकनाथ खडसे म्हणाले की, 2011 मध्ये देशात गरिबीचे प्रमाण 27 टक्के होते, ते आता अवघ्या 2 टक्क्यांवर आले आहे. पंतप्रधान मोदी एकही दिवस सुटी न घेता अहोरात्र काम करतात, म्हणूनच विरोधक त्यांच्यावर जळत आहेत. पंतप्रधानांचा बाप काढून तुम्ही केलेले पाप कुठे फेडाल? त्यांच्यावर जेवढी टीका कराल, तेवढे तुम्ही स्वतःच खड्ड्यात जाल. विदेशात जाऊन देशाची प्रतिमा मलीन करणे हा देशद्रोह एकनाथ खडसे म्हणाले की, यापूर्वी देशाचे पंतप्रधान परदेशात जायचे तेव्हा त्यांची फारशी दखल घेतली जात नव्हती. पण आता जगातील 36 देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार बहाल केला आहे. हे यश विरोधकांना सहन होत नाही, म्हणूनच ते परदेशात जाऊन आपल्याच देशाची आणि पंतप्रधानांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतात. हा थेट देशद्रोह आहे. देशात स्वतः सत्ता गाजवा, नाहीतर देशाला बरबाद करा, अशी देशविरोधी मानसिकता काही लोकांची झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *