![]()
दिल्लीतील मंगोलपुरी इंडस्ट्रियल एरिया फेज-1 मधील बुटांच्या कारखान्यात शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत 4 जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. 2 जणांवर उपचार सुरू आहेत. रेस्क्यू टीमने 6 जणांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले. त्यांना संजय गांधी मेमोरियल रुग्णालयात नेण्यात आले. तर आणखी 5 जणांना इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून बाहेर काढण्यात आले. दुर्घटनेशी संबंधित छायाचित्रे… अधिकाऱ्यांनी सांगितले- आग तळघरात लागली होती दिल्ली अग्निशमन सेवेचे सहायक विभागीय अधिकारी (ADO) पारस कुमार यांनी सांगितले की, या कारखान्यात बूट-चपला तयार करून त्यांचा साठा केला जातो. आग तळघरात लागली होती, जिथे आमच्या पथकाने तिच्यावर नियंत्रण मिळवून ती पुढे पसरण्यापासून रोखली. ते पुढे म्हणाले की, सध्या आग पूर्णपणे विझली असून शीतकरणाची प्रक्रिया सुरू आहे. आता आत कोणीही अडकलेले नाही. अग्निसुरक्षेचे १० नियम दिल्लीतील आगीची मागील मोठी घटना ३ जून: हॉटेलमध्ये आग, २१ जणांचा मृत्यू; मिठी मारलेल्या अवस्थेत आढळले आफ्रिकी जोडप्याचे मृतदेह दिल्लीतील मालवीय नगर येथे असलेल्या फ्लरिश स्टे हॉटेलला 3 जून रोजी सकाळी 8:30 वाजता आग लागली होती. या दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू, तर 28 जण जखमी झाले होते. मृतांमध्ये 11 परदेशी आणि 10 भारतीय नागरिकांचा समावेश होता. परदेशी नागरिकांपैकी 9 जण आफ्रिकी देशांतील होते. दिल्ली अग्निशमन सेवेचे मुख्य अग्निशमन अधिकारी ए.के. मलिक यांनी सांगितले होते की, ही तळमजला अधिक पाच मजली इमारत होती. ये-जा करण्यासाठी केवळ एकच जिना होता. सर्व खिडक्या सीलबंद करण्यात आल्या होत्या, त्यामुळे आत अडकलेल्या लोकांकडे बचावाचे फारच कमी पर्याय होते. मृतांमध्ये एका आफ्रिकन दाम्पत्याचाही समावेश होता. बचाव पथकाला त्यांचे मृतदेह बाथरूममध्ये आढळले, जिथे ते दोघे एकमेकांना मिठी मारून होते. महिला टॉयलेट सीटवर बसली होती, तर तिचा पती जवळ ठेवलेल्या खुर्चीवर बसला होता. दोघांनी एकमेकांना घट्ट पकडले होते आणि महिलेचे डोके पतीच्या खांद्यावर टेकलेले होते. दोघांचाही गुदमरून मृत्यू झाला.
Source link
दिल्लीत बूट कारखान्याला आग, 4 जणांचा मृत्यू:दोघांची प्रकृती गंभीर; सर्वांना बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले