![]()
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये रंगणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे महात्म्य आता सातासमुद्रापार पोहोचणार आहे. या जागतिक सोहळ्याची महती आणि गोदावरीची पावन परंपरा अधोरेखित करण्यासाठी विशेष ‘कुंभगीत’ साकारण्यात आले असून, संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी या गीताला संगीतबद्ध केले आहे. ‘हर हर गंगे… हर हर गोदे’ अशा भक्तीमय ओळींनी सजलेल्या या चार मिनिटांच्या अधिकृत कुंभगीताचे भव्य लाँचिंग शनिवारी (दि. ३१) गोदाघाटावर देशाच्या राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. आपल्या दमदार आणि भावस्पर्शी संगीतासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजय-अतुल या जोडीने या गीताची रचना केली असून, कुंभमेळ्याचा आध्यात्मिक दरवळ यातून अनुभवता येईल.
चार मिनिटांच्या या गीतात नाशिक-त्र्यंबकेश्वरचे धार्मिक महत्त्व, गोदावरी नदीची महती आणि साधू-महंतांची परंपरा यांचा सुरेख संगम साधण्यात आला आहे.२०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याला देश-विदेशातील भाविक व पर्यटकांपर्यंत पोहोचवून त्याला जागतिक स्तरावर एका नव्या उंचीवर नेण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे. गीतातून रेखाटले कुंभचे महत्त्व कुंभाची महती गाणाऱ्या या गीताचे लांॅचिंग शनिवारी गोदाघाटावर हाेत असून या सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत हाेणाऱ्या सोहळ्याने २०२७ च्या कुंभमेळ्याच्या प्रसिद्धी मोहिमेचा अधिकृत नारळ फुटणार अाहे.
Source link
गोदाकाठी आज गुंजणार ‘हर हर गंगे… हर हर गोदे’:कुंभगीत अजय-अतुल यांच्या सुरांनी सजली चार मिनिटांची रचना