Headlines

अपत्य होत नसल्यामुळे विवाहितेचा छळ:सिल्लोडला सहा जणांवर गुन्हा, इलेक्ट्रिक दुकानासाठी 5 लाख रुपयांची केली मागणी




अपत्य होत नसल्याचे कारण पुढे करून तसेच इलेक्ट्रिक दुकान सुरू करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना केळगाव येथे उघडकीस आली. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या त्रासाला व जाचाला कंटाळून अखेर पीडित विवाहितेने पोलिसांत धाव घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली कारभारी घुले (३८) यांना विवाहानंतर काही महिने सुरळीत पार पडल्यानंतर, अपत्य होत नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास देणे व टोमणे मारणे सुरू झाले. पतीला नवीन इलेक्ट्रिक दुकान सुरू करायचे असल्याचे सांगून माहेरून पाच लाख घेऊन येण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जाऊ लागला. माहेरून पैसे आणण्यास असमर्थता दर्शविल्याने विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. वर्षभरापासून हा त्रास असहाय्य झाल्याने वैशाली घुले यांनी गुरुवारी दुपारी १ वाजता सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी कारभारी पुंजाराम घुले, पार्वताबाई पुंजाराम घुले, पुंजाराम खंडू घुले, सुभाष पुंजाराम घुले, रोहिणी सुभाष घुले आणि अश्विनी मधुकर घुले (सर्व रा. बरकतपूर, ता. कन्नड) या सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *