Headlines

छत्रपती संभाजीनगर:दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी




शासनाने दुष्काळग्रस्त घोषित केलेल्या भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे आणि वसूल केलेले शुल्क परत करावे, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाने केली आहे. यासंदर्भात जिल्हाध्यक्ष अक्रम खान यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विभागीय संचालकांना निवेदन देण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या निर्णयानुसार विभागीय केंद्रांतर्गत अभ्यास केंद्रांना तातडीने शुल्क माफीचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. येत्या आठ दिवसांत शुल्क माफ न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनावर अक्रम खान, डॉ. भीमराव वाघमारे, अमरदीप हिवराळे व क्षितीज सिंह यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *