![]()
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत तुल्यबळ लढतींमुळे द्वितीय पसंतीची मते निर्णायक ठरली. जिल्ह्यात भाजपच्या साथीने शिवसेनेचे वाशीम येथील विद्यमान आमदार किरण सरनाईक यांनी विजयी बाजी मारली. विजयी होण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा १६ हजार १३४ होता. सरनाईक यांना १६ हजार ६६३ मते मिळाली. विनाअनुदानित शाळा, कॉन्व्हेंटवर वर्षभरातून केंद्रीत केलेले लक्ष, रसद, जनसंपर्क, मतांचे नियोजनामुळे शिंदेसेनेचा विजय सुकर झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या निवडणुकीत शिक्षक संघटनांवर राजकीय पक्ष भारी पडल्याचे निकालावर नजर टाकल्यास दिसून येते. प्रथम तीन उमेदवार हे राजकीय पक्षांचे होते. तसेच काँग्रेसच्या अकोल्याच्या अदिती ऋषिकेश पोहरे यांना ८ हजार ६३६ मते मिळाली. गत दोन निवडणुकीत काँग्रेसला मिळालेली ही विक्रमी मते आहेत. यापूर्वी २०१४च्या निवडणुकीत काँग्रेसला १ हजार ६ मतांवरच समाधान मानावे लागले होते. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीमधील अन्य घटक पक्षांचे नेत्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली होती. जिल्ह्यातून काँग्रेसच्या अदिती पोहरे, प्रा. संतोष हुशे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), िवज्युक्टाचे प्रा. अविनाश बोर्डे, राजकुमार कड, श्रीकृष्ण पहुरकर रिंगणात होते. विभागात अकोल्यातून तगडे आव्हान देण्यात आल्याचे निकालावर नजर टाकल्यास दिसून येते. तसेच महायुती व महाविकास आघाडीत झालेल्या बंडखोरीचा फटका बसला नसल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. जुनी पेंशन योजना, टप्पा अनुदान यासारखे प्रश्न शिक्षक संघटना सोडवू शकतात, असे बहुतांश शिक्षकांना आता वाटत नसल्याने काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आपले जटिल प्रश्न हे राजकीय पक्षांकडूनच सोडवणे शक्य होईल, असे आता शिक्षकांना वाटू लागले आहे. परिणामी निवडणुकीत राजकीय पक्षाचे उमेदवार विजयी झाल्याचे व पक्षांचेच उमेदवार द्वितीय क्रमांकावर राहिले. काँग्रेस : पक्षाने खूप विलंबाने उमेदवार मैदानात उतरवला. एक महिनाच वेळ मिळाला. निवडणूक केवळ विचारधारेवर लढून चालत नसून, ‘अर्थपूर्ण’नीतीला प्राधान्य द्यावे लागते, हे लक्षात घेऊन नियोजन केले नाही. अल्पसंख्याक मते खूप मिळाली तरी मोठ्या प्रमाणात ही मते अन्य उमेदवारांना मिळाली. ही मते रोखणे काँग्रेसला शक्य झाले नाही. काँग्रेसच्या प्रचारसभांमध्ये शिक्षकांपेक्षा राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्तेच जास्त होते, असे जाणकारांचे मत आहे. काँग्रेसच्या अदिती पोहरे या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा राकाँ शरदचंद्र पवार पक्षाचे हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या आहे. त्यांना शिवाजी शिक्षण संस्थेच्या शिक्षकांचीही मते मिळाली. मात्र ही मते विभाजित झाली. शिंदेसेना : कॉन्व्हेंट, विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांची नोंदणी केली. या शिक्षकांच्या एक वर्षापूर्वीपासूनच शिंदेसेनेचे उमेदवार व समर्थक संपर्कात होते. ‘रसद’च्या निमित्ताने संपर्क कसा कायम राहील, याची काळजी घेतली. तसेच आपले प्रश्न शासन सोडवू शकत नाहीत, याची जाणीव या शिक्षकांना होती. त्यामुळे ‘िमळेल ते घ्या’, असाच विचार अनेकांनी केल्याची चर्चा आहे. तसेच या शैक्षणिक संस्थांचालकांचीही ‘मर्जी’ सांभाळण्यात आली. केवळ पहिल्या पसंतीच्या मतांवर अवलंबून राहिले नाहीत. ज्या जिल्ह्यात, तालुक्यात प्रथम पसंतीचे मत मिळू शकत नाही तेथे दुसऱ्या पसंतीच्या मतांचा आग्रह धरण्यात आला. हे नियोजनही निर्णायक ठरले. निवडणुकीत आम्ही युतीधर्म पाळल्याचे भाजप कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत असले तरी यानिमित्ताने भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पेरणी केल्याचे विश्लेषकांचे मत आहे. वाशीममध्ये शक्ती वाढलेल्या आ. किरण सरनाईक यांचा फायदा अकोला लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या वाशीम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघात भाजपला होऊ शकतो. २०२४च्या निवडणुकीत भाजपला ४० हजार ६०० चेच मताधिक्य मिळाले होते. तसेच भाजपच्या नेतृत्वानेही राज्यात अन्य ठिकाणी दगाफटका होऊ नये, यासाठी शिक्षक मतदारसंघात शिंदे सेनेच्या विजयासाठी झटण्याचे फर्मान सोडले होते. परिणामी भाजपनेही शिंदे सेनेला साथ दिली. एकीकडे भाजपने शिंदेसेनेला साथ दिली तरी दुसरीकडे मात्र काँग्रेसचीही राजकीय शक्ती वाढल्याचे दिसून येते. या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेली ८ हजार ६३६ मते ही विक्रमी आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसी एकवटल्याचे दिसून आले. भाजपकडून आगामी निवडणुकीसाठी पेरणी सरनाईकांनी सांभाळले संस्थाचालकांना; काँग्रेसचे ऐनवेळी नियोजन
Source link
शिक्षक मतदारसंघ निवडणूक:दुसऱ्या पसंतीची मते ठरली निर्णायक; भाजपच्या साथीमुळे शिंदेसेनेची बाजी, दुसऱ्या स्थानी राहिलेल्या काँग्रेसने खेचली विक्रमी मते