Headlines

जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना, देवस्थानांना नुकसान भरपाई द्या:मंदिर महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर




दुष्काळात देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना आणि देवस्थानांना सरसकट नुकसान भरपाई व “फार्मर आयडी’ द्या, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने करण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. गतवर्षी कोरडा दुष्काळ पडला नव्हता. मात्र यंदा निसर्गाचा लहरीपणा खरीप हंगामाच्या प्रारंभीपासूनच दिसून आला. जूनमध्ये अल्प पाऊस झाला. त्यानंतर जुलैमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले. मात्र ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पावसाचा दीर्घ खंड पडला. परिणामी सोयाबीन सुकले. सप्टेंबरमध्ये उकाडा प्रचंड वाढला. त्यामुळे याचा फटका कपाशीसह अन्य पिकांनाही फटका बसला. कृषी, महसूल व ग्राम विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त पंचनामे केले. अंतिम अहवाल तयार केला होता. पावसाच्या दीर्घ खंडामुळे जिल्ह्यातील ४ लाख २६ हजार ९९५ हेक्टर बाधित झाले असून, जिल्ह्यातील ९९० गावातील ३ लाख ११ हजार २३४ शेतकऱ्यांच्या पिकांची हानी झाली. एल निनोमुळे सरासरीच्या ४० टक्के कमी पाऊस पडला आहे. ६९३ मि. मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र ४२२.८ मि.मी. पाऊस पडला. अशातच सलग दोन महिन्यांपेक्षा दिवस पावसाचा खंड होता. याचा परिणाम पिकांवर झाला असून, आता शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढणार आहे. दरम्यान दुष्काळाच्या पृष्ठभूमीवर, देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्या अधिकृत वहिवाटदार शेतकऱ्यांना तसेच देवस्थानांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देताना महासंघाचे प्रतिनिधी मयूर शर्मा, सोहम खेर्डे प्रमोद अग्निहोत्री, प्रा. राजीव इंगळे, श्रीमती वीणा नानोटी, अधिवक्ता श्री पवनेश अग्रवाल आणि श्रीमती श्रुती भट यांची प्रमुख उपस्थिती होती. अन्याय करू नका शासनाने बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले. अग्रिम मदतही जाहीर केली. मात्र देवस्थान इनाम जमिनी आणि संबंधित अधिकृत वहिवाटदारांना या मदतीपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. ७/१२ उताऱ्यावरील इतर हक्कांच्या नोंदीचे कारण पुढे करत अधिकारी “फार्मर आयडी’ देण्यास टाळाटाळ करत असून, हा अधिकृत शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे, असे महासंघाचे म्हणणे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *