Headlines

धाराशिवमध्ये महायुतीमधील संघर्ष पेटला:आम्ही काही वेठबिगार नाही, सत्तेचा माज खपवून घेणार नाही, तर सत्ता उलथवून टाकू, तानाजी सावंत यांचा भाजपवर निशाणा




धाराशिवमधील शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी कोणतीही गोष्ट लादून घ्यायची नाही. आपण काही वेठबिगार नाही, सत्ता आपल्या जीवावर आली आहे, तसे वागवण्याचा प्रयत्न झाला तर निषेध करत बाहेर पडायचे, सहा महिन्यात जिल्हा परिषदेची सत्ता उलथून टाकेल, असे शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी म्हटले आहे. कुठलाही माज आम्ही खपवून घेणार नाही, आमच्या जीवावर सत्ता आली आहे, जिल्हा परिषद आमची सुद्धा आहे. आम्ही म्हणू तो कायदा असे चालणार नाही, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष भाजपला टोला लगावला आहे. पदवीधर निवडणुकीपासून सुरू झालेला भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद आता धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्तेपर्यंत येऊन पोहोचला आहे तानाजी सावंत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करण्याचा मंत्र दिला आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना मदत करण्याकडे जास्त लक्ष केंद्रित करत आहोत. शिवसेनेचा जन्मच समाजकारणासाठी झाला आहे, म्हणून आम्ही जनतेच्या सुख-दुखात धावून जातो. ..तर ग्रामीण भागातील लोकं शहरात जातील तानाजी सावंत म्हणाले की, राज्यात दुष्काळामुळे खूप विदारक चित्र निर्माण झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात आपल्याकडे अनेक वेळा परतीचा पाऊस पडत असतो पण यावर्षी मात्र पाऊस पडला नाही. त्यामुळे भयानक दुष्काळ आहे, आता पुढचे एक-दोन महिने गेल्यावर सर्व काही ओसाड होईल. गावागावातील लोकं शहरात स्थलांतरीत होतील. हे कुठे तरी थांबवायचे असेल तर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसह पाणी आणि वैरणाची व्यवस्था करुण द्यावी लागेल. शेतकऱ्यांनी चुकीचा निर्णय घेऊ नये तानाजी सावंत म्हणाले की, सरकारने मायक्रो फायनान्सच्या किंवा कुठल्या बँकेच्या कर्जाला स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांच्या दारात जाऊन त्यांच्यावर दबाव आणू नका असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तर स्पष्ट सांगितले आहे की शेतकऱ्यांना त्रास देऊ नका नाही तर परिणामाला सामोरे जावे लागेल. आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, शेतकऱ्यांनी चुकीचा निर्णय घेऊ नये. आर्थिक, चारा, अन्नधान्य, मुलांची फीस, लग्न यासाठी आम्ही प्रयत्न करू. तुमच्या दारापर्यंत कोणाला येऊ देणार नाही. शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून प्रयत्न तानाजी सावंत म्हणाले की, शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी आम्ही रेशनकार्ड धारकांना 5 किलो साखर आम्ही देत आहोत. तर 35 ते 40 हजार दिवाळीचे कीट तयार करतो, त्यामध्ये तेल, रवा, साखर, दाळ, मोती साबण, चिवडा सर्व काही आहे. एक कुटुंब दिवाळी साजरी करू शकेल या दृष्टीने आम्ही हे कीट तयार केले आहे. दिवाळी कडू होऊ नये यासाठी मी प्रयत्न करत आहोत. 5 हजार रुपयांची आग्रीम मदत सरकारकडून शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे. केवळ दिवाळीसाठी ही मदत करण्यात येत आहे, ती काही अंतिम मदत नाही. प्रत्येकांच्या घरी दिवा पेटावा म्हणून ही मदत केली जात आहे. येत्या 24 ते 48 तासांत सरकारकडून येणारी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात येईल. पुढे आणखी मदत शेतकऱ्यांना मिळेल. हे ही वृत्त वाचा

राज्याचे नेतृत्व बदलून एकनाथ शिंदेंकडे द्या:शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांची मागणी; म्हणाले- भविष्यात शिंदे-ठाकरे एकत्र येऊ शकतात
विधान परिषद निवडणुकीतील महायुतीच्या कामगिरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या निकालाला राज्याच्या नेतृत्वाचा पराभव असल्याचे सांगत, राज्याचे नेतृत्व बदलून ते पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले पाहिजे, या आपल्या मागणीचा शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी पुनरुच्चार केला आहे. यासोबतच, शिवसेनेवर युतीधर्म न पाळल्याचा आरोप करणारे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावरही त्यांनी ‘ते पगारी माणूस आहेत, त्यांचे काय ऐकता?’ अशी टीका केली आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *