![]()
संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजातील माणसांना जोडणारे आणि संवेदनशीलतेची जाणीव निर्माण करणारे प्रभावी माध्यम आहे, याचा प्रत्यय अमरावती येथे आयोजित ‘आजा सनम मधूर चाँदनी में हम’ या सांगितिक कार्यक्रमातून आला. एसआयएमएसद्वारे संचालित सा इंटरनॅशनल म
.
‘स्वर सम्राट मन्ना डे’ यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात सा इंटरनॅशनल म्युझिक अकॅडमीच्या कलाकारांसह महिला महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संगीताचा आनंद रसिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच गरजू कलाकारांच्या पाठीशी समाजाने उभे राहावे, हा विचार आयोजकांनी कृतीतून मांडला. प्रा. विद्या व्यास यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची संकल्पना आणि सामाजिक उद्देश स्पष्ट केला. ॲड. मिलींद जोशी यांनी सूत्रसंचालन करत गीतांची वैशिष्ट्ये आणि जुन्या हिंदी चित्रपटसंगीताचा सांस्कृतिक वारसा रसिकांसमोर उलगडला.‘दिल की गिरह खोल दो’ सविता पडोळे, ‘मुड़ मुड़ के ना देख’ प्रा. स्मिता पाटील, ‘जहाँ मैं जाती हूँ वहीं चले आते हो’ जान्हवी बल्लाळ, ‘तुम गगन के चंद्रमा हो’ स्वरमयी चौधरी आणि ‘मस्ती भरा है समा’ डॉ. जयश्री नांदुरकर यांनी या गीतांमध्ये संगत दिली. कार्यक्रमाच्या शीर्षकाला साजेसे ‘आजा सनम मधूर चाँदनी में हम’ हे युगलगीत निकिता मोने यांच्या सहभागातून सादर करण्यात आले.
‘ये रात भीगी भीगी’ राधा बनकर, ‘प्यार हुआ इकरार हुआ’ विद्या व्यास, ‘चुनरी संभाल गोरी’ अमृता वाठोडकर, ‘या अल्लाह या अल्लाह दिल ले गई’ छाया अग्रवाल आणि ‘लागा चुनरी में दाग’ निकिता मोने यांनी साथ दिली, या गीतांनीही रसिकांची दाद मिळवली.
ॲड. मिलिंद जोशी यांनी ‘ऐ मेरी ज़ोहरा जबीं’ हे गीत सादर केले, तर आयुष तिवारी यांच्या ‘चलत मुसाफिर मोह लिया रे’ या सादरीकरणाने कार्यक्रमात वेगळी रंगत आणली. रामेश्वर काळे आणि त्यांच्या संचाने संगीत संयोजनाची जबाबदारी सांभाळली.कार्यक्रमाच ्या आयोजनात प्रा. डॉ. दीपक चौधरी, शुभम पांडे, आयुष तिवारी, ॲड. मिलिंद जोशी, अकॅडमीचे विद्यार्थी, कलाकार आणि संगीतप्रेमींनी योगदान दिले. कार्यक्रमाच्या प्रसिद्धी व प्रसारासाठी अमरावती महानगरपालिकेचे स्वीकृत सदस्य श्री. प्रशांत देशपांडे, ज्येष्ठ संगीततज्ज्ञ सुरमणी कमलताई भोंडे, अमरावती जिल्हा न्यायालयाचे परीक्षित गणोरकर, अमरावती जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुनील देशमुख तसेच उदयोन्मुख कलावंत आल्हाद आळशी आणि आलोक आळशी यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुलदीपसिंह मोहाडिकार आणि नूतन विदर्भ शिक्षण मंडळ, अमरावतीच्या पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांना संगीतासोबत सामाजिक जाणिवेचे शिक्षण या कार्यक्रमात सा इंटरनॅशनल म्युझिक अकॅडमी तसेच महिला महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. अनुभवी कलाकारांसोबत रंगमंचावर सादरीकरण करण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यक्रमाचा अनुभव मिळाला. त्याचबरोबर संगीताच्या माध्यमातून सामाजिक कार्यात योगदान देण्याची संधीही त्यांना प्राप्त झाली. विद्यार्थ्यांचा सहभाग हा केवळ सांगीतिक सादरीकरणापुरता मर्यादित न राहता सामाजिक संवेदनशीलतेशी जोडला गेला. गरजू कलाकारांच्या कार्याची दखल घेणे, त्यांच्या सन्मानासाठी पुढाकार घेणे आणि समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखणे, ही मूल्ये अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये रुजतात.
ज्येष्ठ कलाकारांच्या सन्मानातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श संगीत क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणारे ज्येष्ठ तबला निर्माते सुरेश लांडगे यांचा कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह आणि रोख आर्थिक मदत देऊन सन्मान करण्यात आला. कलाकारांच्या कलेचा गौरव करताना त्यांच्या जीवनातील गरजांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे, ही भावना या उपक्रमामागे होती. लांडगे यांचा सन्मान उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. आर्थिक मदतीच्या माध्यमातून कलाकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच कला क्षेत्रातील परस्पर सहकार्याचे महत्त्व अधोरेखित झाले.