![]()
विधान परिषद निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश न मिळाल्याने आता भाजप आणि शिवसेना यांच्यात उघडपणे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेनेने युतीधर्म पाळला नसल्याचा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केल्यानंतर, आता शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. “विजयाचे श्रेय घेता, तर पराभवाचेही घ्या. बंदखोलीत बसून तुमचा ‘बनपणा’ बंद करा,” अशा शब्दांत बच्चू कडू यांनी नवनाथ बन यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘विजयाचं श्रेय घेता तर हारण्याचंही घ्या’ बच्चू कडू म्हणाले, जर तुम्ही जिंकण्याचं श्रेय घेत असाल, तर हारण्याचंही श्रेय घ्यायला शिकलं पाहिजे,” असा टोला त्यांनी लगावला. ‘ज्यांच्यामुळे सत्ता, त्यांनाच बदनाम करताय?’ नवनाथ बन यांच्यावर निशाना साधताना कडू यांनी भाजपला शिवसेनेच्या उपकारांची आठवण करून दिली. “शिवसेनेला कोणत्याही कारणावरून बदनाम करत असाल, तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. ज्या शिवसेनेमुळे आज महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता दिसतेय, त्याच शिवसेनेला तुम्ही बदनाम करत आहात,” असा संताप त्यांनी व्यक्त केला. ‘नवनाथ बनांनी थोडं डोकं लावावं, बनपणा बंद करावा’ नवनाथ बन यांच्यावर थेट निशाणा साधत बच्चू कडू म्हणाले, “बन साहेब, थोडं रस्त्यावर या. तुमच्यामुळे नसलेले वाद वाढू देऊ नका. बंदखोलीत बसून तुम्ही हा जो ‘बनपणा’ सुरू केला आहे, तो बंद केला पाहिजे. तुम्ही थोडंसं डोकं लावायला पाहिजे.” अमरावतीतील भाजपच्या बंडखोरीची काढली यादी केवळ शिवसेनेने युतीधर्म पाळला नाही, या आरोपाला उत्तर देताना बच्चू कडू यांनी थेट अमरावती जिल्ह्यातील भाजपच्या बंडखोरांची नावेच वाचून दाखवली. “अमरावती जिल्ह्यात भाजपची बंडखोरी झाली नाही का? पवार बंडखोरीत होते, भाजप नेते अनिल बोंडे यांच्या भगिनी होत्या, एकाचा जावई उभा होता. हे सगळं बन यांना दिसलं नाही का? हे अजिबात बरोबर नाही,” असे कडू यांनी स्पष्ट केले. नवनाथ बन काय म्हणाले होते? मित्रपक्षाच्या एका जागेच्या हव्यासापोटी आमचा उमेदवार पुणे पदवीधर मतदारसंघात पराभूत झाला. तर छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार चव्हाण यांना शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांनी विरोध करत त्यांच्या विरोधात काम केले. पुण्यात तर रवींद्र धंगेकर यांनी मतदारांना जाहीर पणे आवाहन केले की भाजपच्या उमेदवाराला मतदान करू नका. धंगेकर यांनी केसाने गळा कापण्याचा निर्णय घेतला असेल तर एकनाथ शिंदेंनी धंगेकर यांच्यावर कारवाई केली पाहिजे. शिक्षक मतदारसंघापूरते आम्ही समजू शकतो पण पदवीधरमध्ये उमेदवार नसताना भाजपचे काम केले नाही, असे नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना माझा प्रश्न आहे की रवींद्र धंगेकर हे शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत, ते जर पदवीधरांना आवाहन करत असतील की भाजपला मतदान करू नका तर हे अतिशय गंभीर आहे. त्यांच्यावर एकनाथ शिंदे कारवाई करणार का? अमरावतीमध्ये महायुतीम्हणून आम्ही शिवसेनेला संपूर्ण मदत केली. काही लोकांनी बंडखोरी केली त्यांना 6 वर्षांसाठी रवींद्र चव्हाणांनी पक्षातून निलंबित केले. एकनाथ शिंदे हिंदुत्वासाठी भाजपसोबत आले आहेत ते धंगेकरांवर कारवाई करतील अशी आम्हाला खात्री आहे. ———– हेही वाचा.. परीक्षा शुल्कावरून रोहित पवार विद्यार्थ्यांसाठी आक्रमक:म्हणाले- सवलती कमी आणि अटी जास्त, सरकारने 2 तारखेपूर्वी सरसकट निर्णय घ्यावा
राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि शैक्षणिक शुल्क माफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरकारने नुकताच परीक्षा शुल्क माफीचा निर्णय जाहीर केला असला, तरी त्यात सवलती कमी आणि जाचक अटीच जास्त असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे. तसेच, येत्या २ तारखेपूर्वी सरकारने औदार्य दाखवून विनाअट सरसकट शुल्क माफीचा निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे. रोहित पवार यांनी पोस्ट करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले आहे. सविस्तर वाचा
Source link