![]()
चिकलठाणा येथील आठवडी बाजार परिसरात सुरू असलेल्या एका नव्या इमारतीच्या पार्किंगचा स्लॅब गुरुवारी (२९ ऑक्टोबर) रात्री ७.३० वाजेच्या सुमारास अचानक कोसळला. या दुर्घटनेत चार मजूर मलब्याखाली अडकले होते. सुदैवाने त्यापैकी ३ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, एक मजूर अद्यापही मलब्याखाली दबल्याचा संशय असून, रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दल आणि पोलिसांकडून त्याचा युद्धपातळीवर शोध सुरू होता. अंकुश शांताराम कांबळे (३५, रा. विजयनगर, गारखेडा) आणि अशपाक शेख कडू (२५, रा. सुंदरवाडी) अशी बचावलेल्या जखमी मजुरांची नावे आहेत. मलब्याखाली अडकलेल्या बेपत्ता मजुराचे नाव खंडू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तो अडकला की नाही याबाबतही संभ्रम आहे. …अन् दुर्घटना घडलीच! चिकलठाण्यातील आठवडी बाजारात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळल्यानंतर एक जण मलब्याखाली दबल्याच्या शंकेनंतर नागरिकांकडून त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध घेण्याचे काम सुरू होते. ठेकेदाराकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न या गंभीर दुर्घटनेची सविस्तर माहिती बाहेर येऊ नये, यासाठी ठेकेदाराच्या माणसांनी गर्दीत शिरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला व्यवस्थित माहिती देणाऱ्या मजुरांनी काही वेळातच आपली विधाने बदलली. ‘माझ्या शेजारी काम करणाऱ्याचे नाव माहीत नाही’, ‘खाली किती लोक होते ते आठवत नाही’, अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्यात येत होती. दरम्यान, घटनेनंतर राठोड नावाचा मुख्य ठेकेदार घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. बचावलेल्या जखमींवर उपचार सुरू मुख्य रस्त्याला लागून असलेल्या या इमारतीचे बांधकाम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. तळमजल्यावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून, त्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. स्लॅबचा आधार देणारा सपोर्ट कमकुवत झाल्याचे लक्षात आल्याने मजूर तो दुरुस्त करण्यासाठी खाली गेले होते. त्याच वेळी अचानक स्लॅब कोसळला. अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी अशोक खांडेकर, पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक गणपत राहिरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या वेळी महापौर समीर राजूरकर, विरोधी पक्षनेते समीर बिल्डर आणि नगरसेवक काकासाहेब काकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याची पाहणी केली. पॅरलल इन्व्हेस्टिगेशन
Source link
संभाजीनगरात सपोर्ट दुरुस्ती करताना नवीन इमारतीचा स्लॅब कोसळला:3 मजूर बचावले, 1 दबल्याची भीती, चिकलठाणा आठवडी बाजार परिसरातील घटना