Headlines

शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या आमदाराची आमदारकी रद्द करा:अदानी-अंबानींच्या डेटा सेंटरसाठी लाखो लिटर पाण्याचा वापर- विजय वडेट्टीवार




संकटात सापडलेल्या आणि दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांची टिंगल-टवाळी करून त्यांचा अपमान करण्याचे काम सत्ताधारी आमदारांकडून सुरू आहे. शेतकऱ्यांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीला आमदार म्हणून राहण्याचा कोणताही अधिकार नाही. शिवसेनेने अशा नेत्याला पक्षातून निलंबित केले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने पुढील कारवाई करावी आणि विधिमंडळात प्रस्ताव आणून आपण एकमताने त्यांची आमदारकी रद्द करू. हे आमदार वारंवार खालच्या भाषेत बोलून अपमान करतात, त्यांच्या शब्दांना काही मर्यादाच उरली नाही. शेतकऱ्यांप्रती त्यांचे वक्तव्य अतिशय दुर्दैवी असून, अशा प्रवृत्तीचा निषेध करावा तेवढा थोडा आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी दिली. शिंदे-ठाकरें एकत्रित येणार का नाही माहिती नाही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार का नाही, याबद्दल मला माहिती नाही; त्यांना ही माहिती कुठून आली, हे त्यांनीच सांगावे. कारण रवींद्र धंगेकरांचा अनुभव खूप मोठा आहे. त्यांनी शिवसेनेमधून काँग्रेस आणि काँग्रेसमधून पुन्हा शिवसेना असा प्रवास केला आहे. त्यांची गाडी नेमकी कुठे थांबली आणि त्यांना ही माहिती कशी मिळाली, हे त्यांनीच सांगावे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. मोठ्या प्रमाणात टँकर सुरू विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ पडला असून येत्या काळात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. यापूर्वी कधीही या वेळेस इतक्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचे टँकर सुरू झाले नव्हते, पण आता राज्यात मोठ्या प्रमाणावर टँकर सुरू करावे लागत आहेत. देशातील 60 टक्के डेटा सेंटर एकट्या महाराष्ट्रात विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रात 85 ते 125 च्या दरम्यान डेटा सेंटर आहेत. अदानी-अंबानींना यासाठी फुकटात जमिनी देण्यात आल्या आहेत. या डेटा सेंटरसाठी लाखो लिटर पाण्याची गरज असते. आमचा डेटा सेंटरला विरोध नाही, मात्र सर्वसामान्य लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी लागेल. हे मोठ्या लोकांचे चोचले आता बंद झाले पाहिजेत. देशातील 60 टक्के डेटा सेंटर एकट्या महाराष्ट्रात आहेत. तर सरकारने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे आणि नवीन डेटा सेंटरवर बंदी आणावी, ही गोष्ट आम्ही सरकारच्‍या लक्षात आणून देणार आहोत. नवीन डेटा सेंटरला परवानगी देऊ नये विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रात 10 हजार कोटी रुपयांचा व्यवहार पुढे आला असून, एसआयटी स्थापन केलेली असतानाही या प्रकरणाचा न्याय लागलेला नाही. त्यामुळे यापुढे कोणत्याही नवीन डेटा सेंटरला परवानगी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. हे ही वृत्त रिराईट करा नांदेडला जुन्या वादातून युवकाचा ‎दगड, विटांनी मारहाण करून खून:नंदीनगर येथील घटना; 12 आरोपींना अटक, भांडण सोडवणाऱ्यावर हल्ला
नांदेड शहरातील नंदीनगर येथे जुन्या‎वादातून झालेल्या मारहाणीत ‎युवकाचा मृत्यू झाला. या खुनाच्या ‎‎प्रकरणात मुदखेड पोलिसांनी‎ तातडीने कारवाई करत 12 आरोपींना ‎‎अटक केली. 28 ऑक्टोबरला ‎‎घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी ‎‎आरोपींना ताब्यात घेतले.‎ वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *