Headlines

Navnath Ban Attacks Sanjay Raut Over Vijay Mallya Controversy


“पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात जेव्हा तपास यंत्रणांनी अटक केली होती, तेव्हा ‘मी काय विजय मल्ल्या आहे का?’ असा सवाल विचारणारे संजय राऊत आज आपल्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तकातून त्याच विजय मल्ल्याला थेट महात्मा ठरवण्याचा हास्यास्पद प्रयत्न करत आहेत. बँकांचे

.

भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांनी संजय राऊतांच्या नव्या पुस्तकावर, उद्योगपतींवरील आरोपांवर, आमदार संजय गायकवाड यांच्या शेतकरीविरोधी वक्तव्यावर, पुण्यातून मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या रवींद्र धंगेकरांवर, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील १२ वर्षांच्या विकास प्रवासावर सविस्तर भाष्य केले.

मल्ल्यांच्या व्हिस्कीवर राऊतांचे विशेष प्रेम

संजय राऊतांच्या पुस्तकातील दाव्यांची खिल्ली उडवताना नवनाथ बन म्हणाले, “विजय मल्ल्याने बँकांची कर्जे बुडवली, मात्र केंद्र सरकारने धडक कारवाई करत त्यातील तब्बल 80 टक्के वसुली करून दाखवली आहे. देशातील उद्योजक लाखो तरुणांना रोजगार देतात. तरीही महाविकास आघाडीच्या काळात उद्योजकांच्या घराबाहेर (अँटिलियाबाहेर) बॉम्ब प्लांट करण्याचे कारनामे झाले. सचिन वाझेचे समर्थन करणाऱ्या राऊतांनी अंबानींच्या घराबाहेर बॉम्ब ठेवण्यासाठी काय कट रचला गेला, यावर पुस्तकात एखादा चॅप्टर लिहिला आहे का?”

‘ड्राय डे’ला विरोध का?

“जगात 3 नंबरवर विकली जाणारी व्हिस्की मल्ल्याने तयार केली, असा पुळका राऊतांना आला आहे. मल्ल्यांचा ब्रँड राऊतांना प्रिय असावा; म्हणूनच गांधी जयंतीच्या दिवशी ‘ड्राय डे’ जाहीर झाला की राऊतांचा थयथयाट होतो, कारण सकाळी लावल्याशिवाय त्यांना माध्यमांसमोर बोलता येत नाही.”

पडक्या घराची डागडुजी करा

“उबाठा गटाचे आमदार, खासदार आणि नगरसेवक सोडून गेले असून स्वतःचे साम्राज्य उद्ध्वस्त झाले आहे. आपले पडके घर सावरण्याऐवजी राऊत आता विजय मल्ल्यांची सुपारी घेऊन उकिरडे फुंकत आहेत. आज पुस्तक प्रकाशनाला उपस्थित राहणाऱ्या उद्धव ठाकरेंनी राऊत नेमके कोणाचे वकीलपत्र चालवत आहेत, याचा एकदा खुलासा करावा.”

संजय गायकवाडांच्या शेतकरीविरोधी विधानाचा निषेध; निलंबनावर आमचे एकमत!

आमदार संजय गायकवाड यांच्या शेतकरी आत्महत्यांवरील विधानावर भाजपची अधिकृत भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, “शेतकरी आत्महत्यांवर आमदार संजय गायकवाड यांनी जे असंवेदनशील विधान केले, त्याचे कोणीही सुजाण व्यक्ती समर्थन करू शकत नाही. या मुद्द्यावर संजय राऊत जी भूमिका मांडत आहेत, तीच भाजपची आणि माझीही भूमिका आहे. गायकवाडांच्या विधानावर आमचे राऊतांशी पूर्ण एकमत आहे.”

अलिबागच्या 19 बंगल्यांचा इतिहास काढा

“मात्र शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून मिरवणाऱ्या राऊतांनी अलिबागमध्ये गरीब शेतकऱ्यांना फसवून जमिनी कशा लाटल्या आणि उद्धव ठाकरेंचे 19 बंगले कसे उभे राहिले, यावरही आधी आत्मपरीक्षण करावे.”

देवेंद्रजींवर बोलताना लायकीत राहा; धंगेकरांनी मोदी-शहांच्या नादी लागू नये!

पुण्यातून मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या आमदार रवींद्र धंगेकरांचा समाचार घेताना बन यांनी कडक इशारा दिला. “रवींद्र धंगेकरांना मी माकडछाप का म्हटले? कारण एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारणाऱ्या माकडाप्रमाणे त्यांनी आधी मनसे, मग काँग्रेस आणि नंतर शिवसेना अशा 12 पक्षांत उड्या मारल्या आहेत. मी माकडापासून झालो म्हणणाऱ्या धंगेकरांनी लक्षात ठेवावे, डायनासोर हा जगातील सर्वात बलवान प्राणी होता, तो झुकला नाही; त्याने स्वतःला संपवले पण लाचारी पत्करली नाही.”

देवाभाऊंवर बोलणे सहन करणार नाही

“राणा सूर्यवंशी प्रकरणावरून धंगेकर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोट दाखवत आहेत. देवेंद्र फडणवीस काय आहेत हे महाराष्ट्राला ठाऊक आहे, त्यांच्यावर टीका करण्याची धंगेकरांची पात्रता आणि लायकी नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या अशा लोकांना आवर घालावा, यापुढे फडणवीसांवर अशी पातळी सोडून केलेली टीका भाजप खपवून घेणार नाही.”

डिपॉझिट जप्त झालेले नेते

“पुणे महापालिकेत स्वतःच्या कुटुंबातील लोकांचे डिपॉझिट वाचवता आले नाही, लोकसभेत आणि विधानसभेत जनतेने नाकारले, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या नादी लागू नये. पुण्यात आमचे नेते पुष्कर तुळजापूरकर त्यांना उत्तर द्यायला पुरेसे आहेत.”

निलेश राणेंशी माझे कौटुंबिक संबंध; महायुतीतील वाद आता संपला

निलेश राणे यांच्या विधानावर पडदा टाकत त्यांनी सामंजस्याची भूमिका मांडली. “निलेश राणे माझे मित्र आहेत. त्यांनी मला ज्युनियर म्हटले तरी हरकत नाही, वयाने मी त्यांच्यापेक्षा लहान आहे आणि ते महायुतीचे ज्येष्ठ आमदार आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे महायुतीतील वादावर आता पडदा पडला असून एकनाथ शिंदेंनीही नेत्यांना संयमाच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे हा कलगीतुरा इथेच थांबायला हवा.”

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची 12 यशस्वी वर्षे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाचा गौरव करताना नवनाथ बन यांनी विकासाचा ताळेबंद मांडला. “बरोबर 12 वर्षांपूर्वी, 31 ऑक्टोबर 2014 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडे स्टेडियमवर पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तिथून महाराष्ट्राच्या विकासाचा खरा सुवर्णकाळ सुरू झाला.”

“मेट्रोचे जाळे, मुंबई कोस्टल रोड, अटल सेतू (MTHL), समृद्धी महामार्ग, मराठा समाजाला दिलेले आरक्षण, जलयुक्त शिवार, आणि शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप व मोफत वीज यांसारखे ऐतिहासिक निर्णय देवाभाऊंच्या नेतृत्वात झाले. फडणवीस हे महाराष्ट्राचे खरे ‘डेव्हलपमेंट मॅन’ आहेत.”

2029 पर्यंत महायुतीच सत्तेत

“विधानपरिषद निवडणुकीत भाजप पराभूत झालेला नाही तर शिकला आहे. विरोधी पक्ष रस्त्यावर येऊन गोंधळ घालत असले, तरी देशात मोदीजींच्या आणि महाराष्ट्रात देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली 2029 पर्यंत महायुतीचेच सरकार पूर्ण बहुमताने कायम राहील,” असा ठाम विश्वास नवनाथ बन यांनी शेवटी व्यक्त केला.

———————————————————————–

हेही वाचा…

पुण्यातून रवींद्र धंगेकरांचा गृह खात्यावर हल्लाबोल: मी ‘सीएमचा माणूस’ म्हणत लोकांना लुटणाऱ्या बनावट उद्योजकाला कोणाचा वरदहस्त? 8 दिवसांत कारवाई न झाल्यास ठिय्या आंदोलन

“मी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माणूस आहे, अशी बतावणी करत पोलीस प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या आणि खंडणी, फसवणूक करत सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या एका बनावट उद्योजकाला गृह खात्यातील नेमक्या कोणत्या नेत्यांचे संरक्षण लाभले आहे? आठ दिवस उलटून गेले तरी त्याच्यावर गुन्हा दाखल का होत नाही? जर या प्रकरणाचा तातडीने सोक्षमोक्ष लावला नाही, तर मी स्वतः पोलीस महासंचालक कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन करेन,” असा इशारा पुण्याचे शिवसेना (शिंदे गट) नेते तथा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.