Headlines

उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे रक्त तर एकनाथ शिंदे विचारांचे वारसदार:भविष्यात दोघे एकत्र येऊ शकतात; रवींद्र धंगेकरांचा मोठा दावा




नुकत्याच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. या तिन्ही नेत्यांमधील चर्चेनंतर आता शिवसेना (शिंदे गट) नेते रवींद्र धंगेकर यांनी एक अतिशय मोठा दावा केला आहे. “उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे रक्ताचे वारसदार आहेत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या विचारांचे वारसदार आहेत. राजकारणात काहीही होऊ शकते, त्यामुळे हे दोन्ही नेते (ठाकरे-शिंदे) भविष्यात एकत्रही येऊ शकतात,” असे विधान धंगेकर यांनी केले आहे. ‘उद्धव ठाकरे रक्त, तर एकनाथ शिंदे विचारांचे वारसदार’ सध्या दोन्ही शिवसेना गटांमध्ये सुरू असलेल्या टीकेबाबत बोलताना धंगेकर म्हणाले, “यामध्ये कोणताही दबाव वगैरे नाही. उद्धव साहेब हे शिवसेना प्रमुखांचे रक्त आहे. त्यामुळे कुठे वाकायचे आणि कुठे उभे राहायचे हे त्यांना सांगायची गरज नाही. तर दुसरीकडे, एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुखांचे वारसदार म्हणून आणि त्यांच्या विचारांवर काम करत आहेत. हे दोघेही लढणार आहेत.” ‘राजकारणात काहीही होऊ शकतं’ भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात का? या प्रश्नावर थेट उत्तर देताना धंगेकर यांनी एक शक्यता वर्तवली. “राजकारणात काहीही होऊ शकतं, हे काय लपून राहिलेले नाही. त्यामुळे राजकारणाचा भाग सोडला, तर महाराष्ट्राची परंपरा आणि महाराष्ट्राचा वारसा जपत सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. ठाकरे-फडणवीस भेटीबाबत सूचक भाष्य राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंचावरील उपस्थितीबाबत आणि त्यांच्यातील राजकारणाबाबत विचारले असता धंगेकर म्हणाले, “त्यांच्या चर्चेत राजकारण असू दे वा नसू दे, ज्याची त्याची राजकीय भूमिका स्पष्ट आहे. एका व्यासपीठावर गेल्यानंतर, एखाद्या व्यक्तीने बोलावले म्हणून एकत्र येऊन त्या कामाचे कौतुक करणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या जडणघडणीत भर घालणारा होता.” ‘वैयक्तिक कुरघोड्या थांबतील अशी अपेक्षा’ सध्याच्या राजकीय वातावरणावर बोलताना धंगेकर यांनी सकारात्मक आशा व्यक्त केली. “मधल्या काळामध्ये नेत्यांमधील जो संवाद तुटत चालला होता आणि वैयक्तिक पातळीवर ज्या राजकारणातील कुरघोड्या सुरू होत्या, त्या थांबवण्याचा हा एक प्रयत्न होईल असे मला वाटते,” असे ते म्हणाले. एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार संघर्ष सुरू असताना आणि दोन्ही शिवसेना एकमेकांवर टीका करतअसताना, धंगेकर यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता शिंदे आणि ठाकरे भविष्यात खरंच एकत्र येऊ शकतात का? या राजकीय चर्चेला नव्याने तोंड फुटले आहे. रवींद्र धंगेकर हे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. ——————- हेही वाचा.. फडणवीसांसह ठाकरे बंधू एकाच मंचावर: कार्यक्रमाआधी बंद दाराआड चर्चा, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या भूमिका घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात आयोजित एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने हे नेते एकत्र आले. विशेष म्हणजे, सार्वजनिक कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आल्याने या भेटीबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *