![]()
दिवाळी आणि आगामी लग्नसराईच्या मुहूर्तावर सुवर्ण बाजारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. ग्राहकांचा कल जुने सोने मोडून नवीन दागिने खरेदी करण्याकडे लक्षणीयरीत्या वाढला आहे. पूर्वी एकूण खरेदीमध्ये जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवीन दागिने घेण्याचे प्रमाण अवघे २५ टक्के होते, ते आता थेट ५० टक्क्यांवर पोहोचले आहे. देशातील सोन्याची आयात कमी व्हावी आणि अंतर्गत साठ्याचा पुनर्वापर व्हावा, यासाठी सुवर्ण व्यावसायिकांकडूनही एक्सचेंज पद्धतीला अधिक प्रोत्साहन दिले जात आहे. गोल्ड एक्सचेंज करताना ग्राहकांच्या जुन्या सोन्याची कॅरेटनुसार वर्गवारी केली जाते. यामध्ये २२ कॅरेटसाठी २२ कॅरेट, २४ कॅरेटसाठी २४ कॅरेट आणि १८ कॅरेटसाठी १८ कॅरेटचे नवीन दागिने दिले जातात. यात सोन्याच्या मूळ वजनाचे पूर्ण मूल्य ग्राहकाला मिळते आणि त्यांच्याकडून केवळ नवीन दागिन्यांची घडणावळ आकारली जाते. तसेच एकाच पेढीतून खरेदी करुन एक्सचेंज केल्यास कॅरोटीमीटरची गरज भासत नाही, कारण त्यांचे ओरिजनल बिल असतेच, असे सवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. नितीन खंडेलवाल, सुवर्ण व्यावसायिक काही दिवसांमध्ये वधारणार सोन्याचे दर अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हची आगामी बैठक आणि निवडणूक निकालामुळे जागतिक बाजारातील अनिश्चितता दूर होऊन येत्या काही दिवसांत सोन्याचे भाव पुन्हा वधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य दरवाढीपूर्वीच चालू घसरणीचा फायदा घेण्यासाठी सर्वसामान्य ग्राहक व गुंतवणूकदार सोने खरेदीला पसंती देत आहेत.
Source link
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवीन खरेदी 50 टक्क्यांवर, सोन्याच्या दरात 15 दिवसांत 4 हजारांची घसरण; अकोल्यात ग्राहकांच्या खरेदीला वेग