Headlines

परीक्षा शुल्कावरून रोहित पवार विद्यार्थ्यांसाठी आक्रमक:म्हणाले- सवलती कमी आणि अटी जास्त, सरकारने 2 तारखेपूर्वी सरसकट निर्णय घ्यावा




राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि शैक्षणिक शुल्क माफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरकारने नुकताच परीक्षा शुल्क माफीचा निर्णय जाहीर केला असला, तरी त्यात सवलती कमी आणि जाचक अटीच जास्त असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे. तसेच, येत्या २ तारखेपूर्वी सरकारने औदार्य दाखवून विनाअट सरसकट शुल्क माफीचा निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे. रोहित पवार यांनी पोस्ट करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले आहे. ‘सवलती कमी आणि अटी जास्त’ विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे सांगत रोहित पवार म्हणाले, “राज्यभरातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी आणि शैक्षणिक शुल्क माफी मिळावी, यासाठी आम्ही सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. मात्र, सरकारकडून केवळ परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेण्यात आला; आणि त्यातही सवलती कमी आणि अटी जास्त, असाच प्रकार झाला आहे.” रोहित पवारांच्या ४ प्रमुख मागण्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत रोहित पवार यांनी सरकारसमोर आणि प्रशासनासमोर स्पष्ट मागण्या ठेवल्या आहेत: अधिकाऱ्यांशी चर्चा सकारात्मक, पण सरकारकडे ‘औदार्या’ची अपेक्षा या मागण्यांसंदर्भात आपण प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला असून अधिकारी याबाबत सकारात्मक असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. मात्र, अंतिम निर्णय सरकारला घ्यायचा असल्याने त्यांनी सरकारला थेट आवाहन केले आहे. “सरकारने जाचक अटी घालून निर्णय घेण्यापेक्षा औदार्य दाखवून सर्व विद्यार्थ्यांना सरसकट लाभ होईल, असा निर्णय येत्या २ तारखेपूर्वी घ्यावा,” अशी विनंती त्यांनी राज्य सरकारला केली आहे.
———— हेही वाचा.. टायगर श्राॅफ गोळीबार प्रकरण:मूळ कटाचा अजूनही उलगडा झाला नाही, न्यायालयाने 11 आरोपींना 6 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील सर्व अकरा आरोपींना येथील विशेष मकोका न्यायालयाने गुरुवारी ६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या (मकोका) अंतर्गत पुन्हा अटक केल्यानंतर आरोपींना विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्यासमोर हजर करण्यात आले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *