Headlines

शालेय क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून घडतात गुणवंत खेळाडू- खुरांगे:जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेचे उत्साहात केले उद्घाटन




जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि अहिल्यानगर जिल्हा किक बॉक्सिंग स्पोर्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षांखालील वयोगटांतील सुमारे ३०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. यावेळी खुरांगे यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना म्हणाले, शालेय क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडू घडत असतात. या स्पर्धांमुळे त्यांना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळते. असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष नितीन शेलार म्हणाले, किक बॉक्सिंग हा खेळ आता थेट ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत सुमारे ३०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. शालेय क्रीडा स्पर्धांमधून खेळाडू घडतात आणि विविध स्पर्धांना सामोरे जाण्याचा अनुभव त्यांना मिळतो. क्रीडा क्षेत्रात खेळाडूंसाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. शासनाच्या नोकऱ्यांमध्येही खेळाडूंसाठी पाच टक्के आरक्षणाची तरतूद आहे. प्रत्येक खेळाडूने जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावे. कोणत्याही खेळात सातत्य राखणे महत्त्वाचे असून, त्यातूनच यशाचा मार्ग सोपा होतो. १४, १७ आणि १९ वर्षांखालील खेळाडूंसाठी या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यातील विजेते खेळाडू विभागीय स्तरावर खेळण्याची संधी मिळवतील, असे शेलार यांनी सांगितले. यावेळी क्रीडा अधिकारी प्रवीण कोंढावळे, सचिन मकासरे, जयेश आनंदकर, ओंकार झोडगे, माऊली जमदाडे, सचिन साळवे उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *