Headlines

वारंवार वीज खंडित होण्याची कारणे शोधा, दोष दूर करा!:मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी मोर्शी विभागातील वीज वितरण व्यवस्थेचा घेतला आढावा



सुरळीत आणि अखंड वीजपुरवठा राखण्यात विद्युत उपकेंद्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे उपकेंद्रांमध्ये उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींची कारणे शोधून त्यांचे वेळेत निराकरण करण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप द

.

त्यांनी बुधवार (दि. २८) मोर्शी विभागातील ३३ केव्ही मोर्शी, ३३ केव्ही हिवरखेड आणि १३२ केव्ही मोर्शी या विद्युत उपकेंद्रांना भेट देऊन वीज वितरण व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.

ग्रामीण वीज वितरण यंत्रणा बळकट करण्याच्या दृष्टीने आशियाई विकास बँकेच्या आर्थिक सहाय्यातून उभारण्यात येणाऱ्या जिल्ह्यातील १४, तर मोर्शी विभागातील पाच उपकेंद्रांच्या कामकाजाची माहिती मुख्य अभियंता दोडके यांनी घेतली. यावेळी टाकरखेडा मोरे आणि खारवाडी येथील प्रस्तावित उपकेंद्रांच्या जागेबाबतही चर्चा करण्यात आली.

फिडरनिहाय वीजपुरवठ्याची स्थिती तपासताना वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे तसेच वाढत्या वीजभारामागील कारणांचा सखोल शोध घेऊन त्यावर कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. वीजबिल वसुलीचा आढावा घेताना ऑक्टोबर महिन्यातील वसुली अपेक्षित उद्दिष्टाच्या तुलनेत कमी असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. थकबाकी कमी करण्यासाठी वीजबिल वसुलीच्या कामाला गती देऊन विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी केल्या. तसेच वीजचोरीला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवून निर्धारित उद्दिष्टानुसार वीजचोरीची प्रकरणे शोधणे आणि त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. वीजग्राहकांना अचूक वीजबिल देणे ही महावितरणची जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत मुख्य अभियंता दोडके यांनी सदोष मीटर, सरासरी बिलिंग आणि बिलिंग प्रक्रियेतील त्रुटींचा आढावा घेतला.

बिलिंगमधील त्रुटी दूर करून बिल दुरुस्तीची (बिल रिव्हिजन) प्रकरणे शून्यावर आणावीत, तसेच बिलिंग कार्यक्षमता शंभर टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यावेळी कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट, अतिरिक्त कार्यकारी अभियंता काळे, उपकार्यकारी अभियंता वाघेला, दिनेश भागवत, टेकाडे यांच्यासह वित्त व लेखा आणि मानव संसाधन विभागातील कर्मचारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *