Headlines

राष्ट्रसंतांना आज 2 लाख भाविकांकडून मौन श्रद्धांजली:ड्रोन व सीसीटीव्हीव्दारे पोलिस ठेवणार लक्ष : वाहन पार्कींगसाठी दास टेकडीजवळ व्यवस्था




लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ५८ वर्षांपूर्वी याच दिवशी (तिथीनुसार) सायंकाळी ४ वाजून ५८ मिनिटांनी गुरूकुंज आश्रमात महानिर्वाण झाले होते. त्यामुळेच शुक्रवारी (दि.३०) सायंकाळी ४ वाजून ५८ मिनिटांनी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ, गुरूकुंज आश्रमच्या वतीने भावपूर्ण मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. वंदनीय महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी यावेळी सुमारे दीड ते दोन लाख गुरुदेव भक्त गुरूकुंजात दाखल होणार असल्याचा अंदाज आयोजकांकडून वर्तवण्यात आला आहे. त्यादृष्टीने तयारी करण्यात आली आहे. मागील वर्षी गुरूकुंजात सुमारे दीड ते दोन लाख भाविक दाखल झाले होते. श्रद्धांजलीवेळी सर्वधर्मीय प्रार्थना, सामुदायिक प्रार्थना होणार आहेत. सध्या जगात अनेक ठिकाणी युद्ध, हिंसाचार, धर्मवाद सुरू आहे. जगात सुख व शांती निर्माण व्हावी. याकरिता विश्वशांतीसाठी संकल्पसुद्धा केला जाणार आहे. राष्ट्रसंतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विविध ठिकाणाहून दिंडी, पालख्यांसह लाखो भाविक गुरूकुंजात दाखल झाले आहेत. श्रद्धांजलीचा प्रत्यक्ष सोहळा दुपारी ३.३० वाजतापासून सुरू होतो. तरी दुपारी १ वाजतापासूनच मुख्य मंडपात भाविक दाखल होतात. यावेळी गुरूकुंज मोझरीत येणारे सर्वच रस्ते भाविकांनी फुलून जातात. या ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून वैचारिक प्रबोधन सुरू आहे. मौन श्रद्धांजलीच्या या कार्यक्रमाकरिता देशभरातील साधुसंत, विद्वान, प्रचारक, सामाजिक कार्यकर्ते, भाविक पालखी-दिंड्यासह गुरूकुंज आश्रमात येतात. पुण्यतिथी महोत्सवातील मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम सर्वात भावोत्कट असतो. श्रद्धांजलीच्या कार्यक्रमापूर्वी मुख्य सभामंडपात राष्ट्रसंतांचे गुरु आडकोजी महाराज यांच्या वरखेड येथील पालखीचे स्वागत व पूजन करण्यात येते. राष्ट्रसंतांचे जन्मगाव यावली आणि तपोभूमी गोंदोडा येथील पालख्यांचेही अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळातर्फे पूजन करण्यात येते. मौन श्रद्धांजलीच्या दिवशी मानवता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. गर्दीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये. म्हणून साध्या वेशातील २० पोलिस, तसेच १०० अंमलदार व १६ अधिकाऱ्यांचा पोलिस बंदोबस्त राहणार आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ६ या काळात गुरूकुंजात येणारा महामार्ग दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. साध्या वेशात २० पोलिस, १०० अंमलदार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *