Headlines

बपुरीतील महिलांचे आमरण उपोषण मागे, अवैध दारूविक्री कायमस्वरूपी बंद करण्याचे पोलिसांनी दिले आश्वासन




तालुक्यातील बपुरी येथे सर्रास सुरू असलेल्या अवैध दारूविक्री व धंद्यांच्या त्रासाला कंटाळून गावातील महिलांनी पंचायत समितीच्या प्रांगणात सुरू केलेले आमरण उपोषण अखेर पोलिसांच्या मध्यस्थी व आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. माना पोलिस ठाण्याचे ठाणेदार गणेश नावकार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन महिलांशी चर्चा केली.गावातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर महिलांनी लिंबू सरबत घेऊन उपोषणाची सांगता केली. माना पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बपुरी गावात अवैध दारूविक्रीमुळे अनेक कुटुंबांवर गंभीर व विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलक महिलांनी केला. गावातील अवैध दारूविक्री तातडीने बंद करावी. महिलांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावे. यासाठी यापूर्वी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस व अपेक्षित कारवाई न झाल्याने संतप्त महिलांनी अखेर आंदोलनाचा पवित्रा घेत आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. ठाणेदारांच्या आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले असले, तरी बपुरी गावातील अवैध दारूविक्री खरोखरच कायमस्वरूपी बंद होणार का, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. पोलिसांनी दिलेले आश्वासन केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी. तसेच अवैध धंद्यांवर कठोर व सातत्यपूर्ण कारवाई करून गावात शांतता निर्माण करावी, अशी तीव्र अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *