Headlines

जामगावात शॉर्टसर्किटमुळे 40 एकर ऊस जळून खाक:कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे तातडीने गाळपाचे‎निर्देश; तालुकाध्यक्ष बापू चोबे यांची माहिती



तालुक्यातील जामगाव (पा.) येथे विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल ४० एकरांवरील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष बाप

.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चोबे यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर भरणे यांनी संबंधित साखर कारखान्याच्या प्रशासनाशी संपर्क साधून जळालेला ऊस विनाविलंब आणि प्राधान्याने गाळपासाठी उचलण्याचे निर्देश दिले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जामगावच्या ग्राम महसूल अधिकारी पायल चव्हाण, कृषी सहाय्यक आणि गावकामगार पोलीस पाटील काळे यांच्यासह जळीतग्रस्त शेतकरी व ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित झाले. महसूल व संबंधित यंत्रणेकडून आगीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.

जळालेल्या उसाचे वेळेत गाळप व्हावे आणि झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी जळीतग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. उसाचे तातडीने गाळप करण्याबाबत कृषिमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांमुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *